राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy) तयार केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांवरील दोन बोर्डाच्या परीक्षांना सामोरे जाण्याचा ताण कमी होणार आहे. त्या नवीन धोरणानुसार इयत्ता १०वीचे बोर्ड रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन-दोन बोर्डाच्या परीक्षांना सामोरे जाण्यासंबंधी विद्यार्थ्यांवर येणार तणाव कमी होणार आहे.
अशी असेल रचना
- नव्या शैक्षणिक धोरणानुसार १ ली ते ५ वी असा पूर्व प्राथमिक वर्ग असणार आहे.
- ६वी ते ८वी हा माध्यमिककडे राहणार आहे.
- ९, १०, ११, १२ वी हे चार वर्ग उच्च माध्यमिकला जोडले जाणार आहेत, तर १० वी बोर्ड रद्द करून १२ वी एकच बोर्ड केले जाणार आहे.
- त्यामुळे दोन बोर्डाचा विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार आहे.
- नव्या शैक्षणिक धोरणाची (New Education Policy) तातडीने अंमलबजावणी व्हावी म्हणून राज्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण तातडीने घेण्यात आले.
सध्याची विद्यापीठांची रचना लक्षात घेता ३ वर्षांचा महाविद्यालयीन शिक्षणाचा टप्पा हा योग्य असल्यामुळे १२वी पुन्हा उच्च माध्यमिकला जोडून बोर्ड परीक्षा १२वीच्या टप्प्यावर करण्यात आली आहे. तर दुसरा टप्पा ६ वी ते ८ वी हा माध्यमिक, तर ९वी ते १२वी उच्च माध्यमिक तसेच चौथा टप्पा महाविद्यालयीन शिक्षणाचा असणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy) जाहीर झाल्यानंतर ५, २, ३, ४ असा टप्पा जाहीर करण्यात आला होता. मात्र, ११ वीला करावयाचे बोर्ड १२ वीला करण्याचा निर्णय झाल्यामुळे आता शैक्षणिक टप्पे ५, ३, ४, ३ असे होणार आहेत. राज्यात सर्वत्र शिक्षकांचे नव्या शैक्षणिक धोरणासाठी प्रशिक्षण सुरू असून, या प्रशिक्षणादरम्यान हे नवे टप्पे जाहीर करण्यात आले.
Join Our WhatsApp Community