महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघेही स्ट्रिट प्रीमियर लीगच्या फायनल्सना ठाण्यात उपस्थित होते. दादोजी कोंडदेव मैदान या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी, १५ मार्च रोजी सकाळी सहा वाजता मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे.
(हेही वाचा : PM Modi : भाजपाचे ‘मिशन दक्षिण भारत’; ५८ जागांवर लक्ष)
अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केली
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी पार पडली. अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी पार पडली का? हे अद्याप बच्चन कुटुंबापैकी कुणीही सांगितलेले नाही. खुद्द अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करत आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती चाहत्यांनी दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. बिग बी पोस्ट करत म्हणाले, ‘कायम कृतज्ञ…’ बिग बींच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेम व्यक्त करत आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे आभार व्यक्त केलं आहे. बिग बींची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.
Join Our WhatsApp Community