Sunetra Gupta : कोविड-१९ सारख्या संक्रमणावर संशोधन करणाऱ्या सुनेत्रा गुप्ता

सुनेत्रा गुप्ता यांनी लिहिलेल्या मेमरीज ऑफ रेन या कादंबरीसाठी १९९६ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

230
Sunetra Gupta : कोविड-१९ सारख्या संक्रमणावर संशोधन करणाऱ्या सुनेत्रा गुप्ता

सुनेत्रा गुप्ता (Sunetra Gupta) या कादंबरीकार आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील सैद्धांतिक महामारीविज्ञानाच्या प्राध्यापक आहेत. मलेरिया, एचआयव्ही, इन्फ्लूएंझा आणि बॅक्टेरियल मेनिंजायटीस यांसारख्या संसर्गजन्य रोगांच्या कारक घटकांवर त्यांनी संशोधन केले आहे. (Sunetra Gupta)

त्यांचा जन्म १५ मार्च १९६५ रोजी कोलकोता येथे झाला. त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून जीवशास्त्राची पदवी आणि लंडन विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोविड-१९ वर संशोधन केले आहे. मलेरिया, इन्फ्लूएंझा आणि कोव्हिड-१९ व इतर संसर्गजन्य रोग हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. (Sunetra Gupta)

(हेही वाचा – Lok Sabha Election : बसपामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ)

हा होता सुनेत्रा गुप्ता यांच्यासाठी महत्वाचा सन्मान

सुनेत्रा गुप्ता (Sunetra Gupta) आता ब्रिटनमध्ये राहतात. त्या मर्टन कॉलेज, ऑक्सफर्डच्या सुपरन्युमररी फेलो आहेत. तसेच त्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेसच्या युरोपियन सल्लागार मंडळातही कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यासाठी अनेकदा त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांचे पोर्ट्रेट जुलै २०१३ मध्ये प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या समर सायन्स प्रदर्शनात मादाम क्युरी यांच्या सारख्या प्रमुख महिला शास्त्रज्ञांसोबत ठेवण्यात आले होते. हा त्यांच्यासाठी महत्वाचा सन्मान होता. (Sunetra Gupta)

तसेच त्यांनी लिहिलेल्या मेमरीज ऑफ रेन या कादंबरीसाठी १९९६ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना लंडनच्या प्राणीशास्त्रीय सोसायटीचे वैज्ञानिक पदक मिळाले आहे आणि रॉयल सोसायटीचा रोझलिंड फ्रँकलिन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. (Sunetra Gupta)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.