काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची मणिपूर ते मुंबई ‘भारत जोडो न्याय यात्रा’ चालू आहे. या यात्रेचे अनेक व्हिडिओ प्रसारित होत आहेत. याच यात्रेतील नाशिक येथील सभेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
नाशिक येथील सभेपूर्वी सत्कार करतांना एका स्थानिक कार्यकर्त्याने राहुल गांधी यांना विठ्ठलाची मूर्ती देऊ केली. या वेळी प्रथम राहुल गांधी यांनी हातवारे करत ती मूर्ती घेण्यास टाळाटाळ केली, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेही व्यासपिठावर उपस्थित होते. त्या वेळीच हा प्रसंग घडला.
(हेही वाचा – Eknath Khadse : रावेरमध्ये नणंद-भावजय लढत होणार का; काय म्हणाले एकनाथ खडसे ?)
राहुल गांधी मूर्ती स्वीकारताना अनुत्सुक
सत्काराच्या वेळी राहुल गांधी यांना एक कार्यकर्ता फेटा बांधत होता. त्याच वेळी अन्य एका कार्यकर्त्याने विठ्ठलाची मूर्ती पुढे केली; पण फेटा बांधणाऱ्या कार्यकर्त्याने त्याला बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतरही तो कार्यकर्ता विठ्ठलाची मूर्ती घेऊन पुढे येत होता. पण राहुल गांधींनी इतर कार्यकर्त्यांकडून सुरू असलेले सत्कार स्वीकारणे पसंत केले.
य़ासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत असून त्यानिमित्ताने राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे. सत्कार झाल्यानंतर राहुल गांधी यांना ही मूर्ती पुन्हा देण्यात आली; मात्र ती स्वीकारतानाही राहुल गांधी अनुत्सुक दिसले. मूर्ती स्वीकारून त्यांनी ती लगेचच मागे देऊन टाकली.
पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्याबाबतीत अशी टाळाटाळ करण्याने संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत. काँग्रेसने भाजप जाणीवपूर्वक बदनामी करत आहे, असा आरोप केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community