निवडणूक आयोगाने (Election Commission) १४ मार्च रोजी निवडणूक रोख्यांची आकडेवारी जाहीर केल्यानंतर, अनेक राजकारणी आणि काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दावा केला की, पाकिस्तानातील द हब पॉवर कंपनीने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ९५ लाख रुपयांची देणगी दिली होती. समाजवादी पक्षाचा पाठिंबा असलेल्या समाजवादी प्रहरी यांनीही याबाबत ट्विटद्वारे दावा केला आहे की, ही देणगी पुलवामा हल्ल्यानंतर देण्यात आली होती, जी अतिशय गंभीर बाब आहे. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.
समाजवादी पक्षानेही याबाबत ट्विट केले होते की, ‘पाकिस्तानी कंपनी हब पॉवर कंपनीने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ९५ लाख रुपयांची देणगी दिली. त्यावेळी पुलवामामध्ये ४० जवान शहीद झाले होते. भाजपासारखा पक्ष मी कधीच पाहिला नाही. भाजपाला पाकिस्तानी कंपन्यांवर इतके प्रेम का आहे? त्यामुळे भाजपाला हा निधी लपवायचा होता.”
(हेही वाचा – ST महामंडळाच्या LNG रूपांतरण वाहन प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ)
नेमकं सत्य काय?
या दाव्यानुसार, पाकिस्तानी कंपनीने पुलवामा हल्ल्याच्या वेळी भाजपाला पैसे दान केले होते. दाव्यानुसार, पाकिस्तानातील द हब पॉवर कंपनी वीज बनवते, परंतु सत्य हे आहे की, दान केलेली हब पॉवर कंपनी पाकिस्तानी नसून भारतीय आहे. कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. या कंपनीची नोंदणी २०१८मध्ये झाली होती. भारतीय स्टेट बँकेने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने १८ एप्रिल २०१९ रोजी एका राजकीय पक्षाला९५ लाख रुपयांची देणगी दिली. यात कोणताही राजकीय पैलू नाही. म्हणूनच ९५ लाख रुपयांची देणगी देणारी हब पॉवर कंपनी पाकिस्तानी असल्याचा दावा खोटा आहे. भाजपाला ९५ लाख रुपयांची देणगी दिल्याचा दावा चुकीचा आहे, कारण या यादीत पक्षाचे नाव नाही. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की, पाकिस्तानस्थित द हब पॉवर कंपनीने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला कोणतीही देणगी दिली नाही.
पाकिस्तानी कंपनी Hub Power Company ने साल 2019 लोकसभा चुनाव के समय BJP को 95 लाख रूपये चंदा दिया।इसी समय पुलवामा मे भी हमारे जवानों की हत्या हुई थी। BJP जैसा देशद्रोही पार्टी आज तक नही देखा था मैंने। पाकिस्तानी कंपनियों से भाजपा को इतना प्यार क्यों? यही कारण था की भाजपा चंदा… pic.twitter.com/piV51vbQ9x
— Samajwadi Prahari (@SP_Prahari) March 15, 2024
पाकिस्तानी वृत्तपत्रांनुसार, हब पॉवर कंपनी लिमिटेडने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला (भाजप) पैसे दिल्याचा दावा फेटाळला आहे, असे पाकिस्तानी वृत्तपत्रांनी म्हटलं आहे. भारतातील इलेक्टोरल बॉण्डशी याचा संदर्श चुकून लावला जात आहे. यामध्ये हब पॉवर या भारतीय कंपनीचे नावही जोडले जात आहे, मात्र याबाबत कंपनीने म्हटले आहे की, ‘आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, आम्ही या प्रकरणात नाव असलेल्या कंपनीशी किंवा भारतातील इतर कोणत्याही कंपनीशी संलग्न नाही. माध्यमांमध्ये ठळकपणे दिलेल्या देयकांचा हब पॉवर कंपनीशी कोणताही संबंध नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community