Maharashtra Temple Federation: महाराष्ट्रातील ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू, महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती

यावेळी ते म्हणाले की, पुण्याप्रमाणेच नागपूर, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, यांसारख्या अनेक जिल्ह्यातील मंदिरांमध्ये ही वस्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे.

281
Maharashtra Temple Federation: महाराष्ट्रातील ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू, महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती
Maharashtra Temple Federation: महाराष्ट्रातील ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू, महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती

मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यासह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे (Maharashtra Temple Federation) राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Maharashtra Temple Federatio)

यावेळी ते म्हणाले की, पुण्याप्रमाणेच नागपूर, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, यांसारख्या अनेक जिल्ह्यातील मंदिरांमध्ये ही वस्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. मंदिर महासंघाच्या प्रयत्नांचे स्वागत होत असून केवळ महाराष्ट्रातच नव्हे कर्नाटक, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, तसेच देशभरातील अनेक राज्यांमध्ये आणि विदेशातील मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय तेथील विश्वस्तांकडून उस्फूर्तपणे घेतला जात आहेत.

भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता
देशातील अनेक मंदिरांमध्ये काटेकोरपणे नियमांचे पालन राज्य शासनानेही वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. देशभरातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस ठाणे आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहितेचे काटेकोर पालन होते. याच धर्तीवर हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये (Maharashtra Temple Federatio) भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिरात धार्मिकतेला स्मरूनच आचरण हवे…
मंदिरात व्यक्ती स्वातंत्र्याला नव्हे, धर्म आचरणाला महत्त्व श्री तुळजापूर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी विरोध झाला; मात्र त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली की, काही पुरोमागी, आधुनिकतावादी हे कसे चुकीचे आहे, यासाठी टाहो फोडतात. समाजात संस्कृती विषयी चुकीचे विचार पोहोचवतात; परंतु मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. मंदिर विश्वतांनी या सर्वांचा अतिशय चांगला विचार केला आणि हा निर्णय घेतला. त्यामुळे येथून पुढे मंदिराचे पावित्र्य अबाधित राहील आणि संस्कृती रक्षणास मदतच होईल. (Maharashtra Temple Federatio)

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे (Hindu Janajagruti Samiti) पुणे जिल्हा समन्वयक पराग गोखले, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पुणे जिल्हा निमंत्रक ह.भ.प. चोरघे महाराज, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या विश्वस्त संगिता ठकार, कऱ्हे पठार खंडोबा मंदिर देवस्थानचे विश्वस्त अधीवक्ता मंगेश जेजुरीकर, चतुःश्रृंगी देवस्थानचे नंदकुमार अनगळ, हडपसर येथील तुकाई देवस्थानचे सचिव सागर तुपे आदी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.