गेल्या पाच वर्षांत राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्रात जनमताचा कौल कुठल्या बाजूने आहे, याचा वेगवेगळा अंदाज या कल या चाचण्यांमधून वर्तवला जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 16 जानेवारी रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात कोणाची सरशी होणार, याचा अंदाज घेणारे ओपिनियन पोल (Opinion Poll) सध्या प्रसिद्ध होत आहेत. यापैकी अनेक अंदाजांमध्ये वर्तवले जात आहे की, केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार हे मोठ्या बहुमतासह सत्तेवर येईल. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi ने मविआचा २ जागांचा प्रस्ताव फेटाळला)
एबीपी न्यूज (ABP News) आणि सी व्होटर सर्व्हे (C Voter Survey) काय सांगतो ?
दरम्यान, 15 मार्च रोजी एबीपी न्यूज आणि सी व्होटर या दोन संस्थांचे ओपिनियन पोल प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्रात अटीतटीची लढत होईल, असा अंदाज समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला २८, तर महाविकास आघाडीला २० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये महायुतीला ४२.७, तर महाविकास आघाडीला ४२.१ टक्के मते मिळू शकतात. इतर पक्षांना १५.१ टक्के मते जाऊ शकतात. लोकसभेच्या ४८ जागांपैकी २८ जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. २२ जागा भाजपाला, तर ६ जागा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. विरोधी पक्षातील महाविकास आघाडीला २० जागा मिळू शकतात. त्यामध्ये काँग्रेसला केवळ ४ तर उबाठा गट आणि शरद पवार गट यांना १६ जागा मिळतील असा दावा एबीपी न्यूज आणि सी व्होटर या सर्व्हेमधून करण्यात आला आहे.
झी न्यूज आणि मॅट्राइझ यांचे निरीक्षण काय ?
झी न्यूज (Zee News) आणि मॅट्राइझ (matrize survey) यांच्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रात महायुती ४५ जागा जिंकेल, असा दावा केला आहे. महाविकास आघाडीला केवळ ३ जागा मिळतील, असे हा ओपिनियन पोल सांगतो. झी न्यूज आणि मॅट्राइझच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळू शकते. महाराष्ट्रात महायुतीला तब्बल ४५ जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीला केवळ ३ जागा मिळतील, असा दावा या सर्व्हेमधून करण्यात आला आहे. झी न्यूज आणि मॅट्राइझ यांच्या सर्व्हेनुसार महायुतीमध्ये भाजपाला २९, शिवसेना शिंदे गटाला १० आणि अजित पवार गटाला ६ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीमध्ये उबाठा गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांना प्रत्येकी १ जागा मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community