Sanjay Raut काँग्रेसवासी?

संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या खांद्यावर हात टाकलेला फोटो आणि ठळक अक्षरात ‘हमारे देश का नेता’ असा मजकूर झळकत आहे.

700
Sanjay Raut काँग्रेसवासी?
Sanjay Raut काँग्रेसवासी?

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या स्वागतासाठी भांडुप परिसरात लागलेल्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधले असून शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण आहे ‘तो’ बॅनर.

बॅनरवर ना उबाठा, ना ठाकरे

राऊत यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या खांद्यावर हात टाकलेला फोटो आणि ठळक अक्षरात ‘हमारे देश का नेता’ असा मजकूर झळकत आहे. तसेच त्याखाली स्थानिक आमदार आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधु सुनील राऊत (Sanjay Raut) यांचा फोटो बॅनरवर आहे. या व्यतिरिक्त बॅनरवर ना शिवसेना उबाठा, ना उद्धव ठाकरे, ना आदित्य ठाकरे यांचे नाव, फोटो.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र, १० वर्षांच्या कामगिरीचा केला उल्लेख)

गांधी (Gandhi) यांना खुश करण्याचा प्रयत्न

ठाकरे यांना या बॅनरवर अजिबात स्थान देण्यात आले नाही तसेच उबाठा पक्षाचे नाव, चिन्ह असा कसलाही उल्लेख बॅनरवर नसल्याने, राऊत (Sanjay Raut) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा परिसरात होत आहे. राऊत (Sanjay Raut) हे नेहमीच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना खुश करण्याचा तसेच ते आपल्या किती जवळचे आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. बॅनरबाजी हा त्याचाच एक भागही असू शकतो.

रविवारी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जाहीर सभा

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रेचा’ समारोप उदय रविवारी १७ मार्चला मुंबईत होणार असून छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, कॉँग्रेस नेते तसेच अन्य राज्यातील इंडि आघाडीचे काही नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.