माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील संपुआ सरकारच्या काळात चीन सरकारने आपल्या दिल्लीतील दुतावासामार्फत राजीव गांधी फाऊंडेशनला कोट्यवधी रुपयांची देणगी दिली होती. चीनने कोणत्या कामाच्या बदल्यात या देणग्या काँग्रेसच्या संस्थेला दिल्या होत्या? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अशा दोन संस्थांना चीनकडून मिळालेल्या देणगीबाबत काँग्रेसला (Congress) अनेकदा विचारणा करण्यात आली. मात्र काँग्रेसकडून एकदाही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यामुळे गृह मंत्रालयाला चौकशीअंती ऑक्टोबर २०२२ मध्ये या दोन्ही संस्थांचा एफसीआरए परवाना रद्द करावा लागला होता. त्यामुळे काँग्रेसचे चीनसोबत संबंध आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एसबीआयच्या निवडणूक रोख्याच्या मुद्यावरून आक्रमक झालेला काँग्रेस पक्ष चीनने दिलेल्या देणगीच्या मुद्यावर मात्र मूग गिळून बसला आहे. भारताप्रती नेहमीच मत्सर बाळगणाऱ्या चीनकडून काँग्रेसच्या संस्थांनी कशासाठी देणगी स्वीकारली होती? हा मोठा प्रश्न आहे. (Congress)
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना सरकार आणि भारतातील चिनी दूतावासाने काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राजीव गांधी फाउंडेशन (RGF) ला निधी दिल्याचा आरोप वारंवार केला आहे. सोनिया गांधी या RGF च्या अध्यक्षा आहेत आणि त्यांच्या बोर्डात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचाही समावेश आहे. (Congress)
दोन वेगवेगळ्या देणगीदारांकडून देणगी
राजीव गांधी फाऊंडेशनच्या वार्षिक अहवालानुसार, २००५-०६ मध्ये राजीव गांधी फाऊंडेशनला दोन स्वतंत्र देणगीदारांकडून देणगी मिळाली. चीनचे सरकार आणि चिनी दूतावासाला सामान्य देणगीदारांच्या यादीत स्थान देण्यात आले होते. (Congress)
राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट एक थिंक टँक
एका अंदाजानुसार, काँग्रेसच्या (Congress) राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला २००४ आणि २००६ दरम्यान २ दशलक्ष डॉलर, तर २००६ आणि २०१३ दरम्यान ९ दशलक्ष डॉलरची देणगी मिळाली होती. (Congress)
राजीव गांधी फाऊंडेशनला चीनची देणगी
गांधी कुटुंबाशी संबंधित राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा FCRA परवाना का रद्द करण्यात आला? याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत माहिती दिली होती. अमित शाह सांगितले होते की, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून देणग्या मिळाल्याचे तपासात समोर आले आहे. शाह यांच्या म्हणण्यानुसार, हे FCRA नियमांचे उल्लंघन होते, म्हणून परवाना रद्द करण्यात आला. राजीव गांधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी विश्वस्त आहेत. सोनिया गांधी या राजीव गांधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा असून राहुल गांधी विश्वस्त आहेत. (Congress)
राजीव गांधी फाऊंडेशनला २००५-०७ दरम्यान चीनकडून देणग्या मिळाल्याचा आरोप अमित शाह यांनी या आधीच केला होता. केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२२ मध्ये राजीव गांधी फाऊंडेशन (RGF) आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (RGCT) यांचा FCRA परवाना रद्द केला होता. FCRA म्हणजे विदेशी योगदान नियमन कायदा. हा परवाना रद्द केल्यानंतर, फाऊंडेशनला कोणत्याही प्रकारचे परदेशी निधी मिळू शकत नाही. (Congress)
(हेही वाचा – South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबई वरून शिवसेना, भाजपा सोबतची मनसेची संभाव्य युती तुटणार?)
राजीव गांधी फाउंडेशन म्हणजे काय?
राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे हत्या करण्यात आली. त्या दिवशी त्यांनी श्रीपेरंबदुर येथे सभा घेतली. राजीव गांधी फाऊंडेशनची स्थापना २१ जून १९९१ रोजी त्यांच्या हत्येच्या एका महिन्यानंतर झाली. त्याचे कार्यालय जवाहर भवन, दिल्ली येथे आहे. सोनिया गांधी राजीव गांधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. तर, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, अहलुवालिया, सुमन दुबे, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा आणि अशोक गांगुली हे त्याचे विश्वस्त आहेत. राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा एफसीआरए परवाना रद्द केला आहे. या ट्रस्टची स्थापना २००२ साली झाली. ट्रस्टच्या अध्यक्षाही सोनिया गांधी आहेत. राहुल गांधीही त्याचे विश्वस्त आहेत. (Congress)
चीनकडून देणग्यांची खैरात
२०२० मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. या समितीकडे काँग्रेसच्या (Congress) राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या चौकशीची जबाबदारी आली. समितीच्या अहवालाच्या आधारे गृह मंत्रालयाने दोन्ही संस्थांचा एफसीआरए परवाना रद्द केला. (Congress)
अमित शाह यांनी संसदेत सांगितले होते की, २००५ ते २००७ दरम्यान राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी दूतावासाकडून १.३५ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. हे नियमांचे उल्लंघन होते. (Congress)
या कारणास्तव FCRA नोंदणी रद्द करण्यात आली. भारत-चीन संबंधांच्या विकासावर संशोधनासाठी हा पैसा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला २०१९-२० मध्ये ३.३८ लाख रुपयांची विदेशी देणगी मिळाली होती. (Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community