भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election)पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी (16 मार्च) पत्रकार परिषद घेतली. यावेळी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (India’s Chief Election Commissioner Rajeev Kumar ) यांनी देशात सध्या किती मतदार आहेत, याबाबतची मुख्य आकडेवारी जाहीर केली आहे. देशात सध्या 96.8 कोटी मतदार संख्या आहे. यामध्ये 49.7 कोटी पुरुष मतदार आहेत तर 47.1 कोटी या महिला मतदार आहेत”, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राजीव कुमार म्हणाले, भारतात या वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये 1.8 कोटी युवक पहिल्यांदाच मतदार करणार आहेत. शिवाय मतदारांमध्ये 88.4 लाख दिव्यांगांचा समावेश आहे. 19.1 लोक सरकारी नोकरी करत आहेत. शिवाय 48 हजार तृतीयपंथीय मतदार मतदांनाचा हक्क बजावणार आहेत शिवाय देशात 82 लाख ज्येष्ठ मतदार आहे. देशात महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे. 10.5 लाख मतदान केंद्र असणार आहेत. लोकसभा निवडमुकीसाठी 1.5 कोटी निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षारक्षक काम करतात, असं निवडणूक आयुक्तांनी नमूद केलं. (Lok Sabha Election)
– 1.8 कोटी युवक पहिल्यांदाच मतदान करणार
– 88.4 लाख दिव्यांग
– 19.1 सेवेतील अधिकारी
– 19.74 कोटी युवा मतदार (वयवर्ष 20-29)
– 48हजार तृतीयपंथी मतदार
– 82 लाख ज्येष्ठ मतदार ( वयवर्षे 85 पेक्षा जास्त)
- नवीन मतदार १.
निवडणूक आयुक्तांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
निवडणूक आयुक्तांनी यावेळी बोलताना राजकीय पक्षांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. “तुम्ही टीका करू शकता, पण यावेळी कोणत्याही प्रकारे अफवा, फेक न्यूज पसरवणे खपवून घेतले जाणार नाही. खोटी माहिती सोशल मीडियावर टाकली असेल तर संबंधित यंत्रणा ती काढून घेण्यासाठी पाऊले उचलू शकतात”,असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
निवडणुकीत हिंसा टाळण्याचा आमचा निर्धार : राजीव कुमार
निवडणुकांमध्ये हिंसा टाळण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूम असतील. तिथे एकूण पाच feed येतील. पोलिंग स्टेशन, चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय सीमा, आंतरराज्य सीमेवर आहेत. ड्रोन मार्फतही निरीक्षण केले जाईल, असेही आयुक्त यावेळी बोलताना म्हणाले.
हेही पहा –