वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Ambedkar) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Gandhi) यांना छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील सभेला उपस्थित राहण्यासाठी नोव्हेंबर २०२३ ला दिलेले निमंत्रण नाकारून वंचितच्या सभेकडे पाठ फिरवली. आता आंबेडकर (Ambedkar) या अपमानाचा बदला घेणार की काँग्रेसचे निमंत्रण स्वीकारून उद्या रविवारी त्याच ठिकाणी आयोजित केलेल्या सभेला हजेरी लावून राहुल गांधी यांच्या पायाशी जाणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Ambedkar)
इंडी आघाडीतील नेत्यांना आमंत्रण
उद्या रविवारी १७ मार्चला काँग्रेस नेते राहुल गांधी (Gandhi) यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जाहीर सभेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष तसेच इंडी आघाडीतील नेत्यांना आमंत्रित केले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रमुख शरद पवार, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि अन्य नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. (Ambedkar)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगापुढे ‘4-एम’चे आव्हान सर्वात मोठे)
वंचित आघाडीला सभेचे निमंत्रण
मात्र, इंडी आघाडी दूरच, राज्यातील महाविकास आघाडीतही समाविष्ट नसलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Ambedkar) यांनी गांधी (Gandhi) यांना तसेच प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे, अशा भावना वंचितचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले की, “उद्याच्या राहुल गांधी (Gandhi) यांच्या सभेचे निमंत्रण वंचित आघाडीला पाठविले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली. मात्र याबाबत अद्याप काही निर्णय झाला नाही.” (Ambedkar)
हजेरी लावली तर पक्षाची नाचक्की
महाविकास आघाडी आणि वंचित आघाडी यांच्यातील जागावाटपाची बोलणी अद्याप अंतिम झाली नाही. महाविकास आघाडीने दोन जागांचा दिलेला प्रस्ताव आंबेडकर (Ambedkar) यांच्या वंचितने फेटाळून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. तसेच काँग्रेसनेदेखील वंचितला वगळून लोकसभा निवडणूक लढण्याचा ‘प्लान-बी’ तयार ठेवल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत आंबेडकर (Ambedkar) यांनी गांधी (Gandhi) यांच्या सभेला हजेरी लावली तर पक्षाची नाचक्की होईल, अशा भावना वंचितच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. (Ambedkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community