Ratnagiri: डेरवणला २१ मार्चपासून यूथ गेम्स, १८ खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू

182
Ratnagiri: डेरवणला २१ मार्चपासून यूथ गेम्स, १८ खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या दहाव्या डेरवण यूथ गेम्सचे (Youth Games) २१ व २८ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. डेरवण येथील क्रीडासंकुलात १८ खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. (sports competition) (Ratnagiri)

भारतीय आणि ऑलिंपिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील आठ हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबलटेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब, योगासने या वैयक्तिक खेळांसह फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळांचा समावेश आहे. ऑलिंपिकमध्ये समाविष्ट वॉल क्लाइंम्बिंग या साहसी खेळाचीही स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे. विजेत्या खेळाडूंना १०५० पदके, १११ करंडक बक्षीसरूपाने देण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या सभेसाठी काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्र सदन, सावरकर स्मारक आणि बाळासाहेबांचे स्मृतिस्थळही बॅनरने झाकले)

अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडाप्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.