सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीसंदर्भात आयोजित सर्व यंत्रणांच्या संयुक्त बैठकीच्यावेळी अरुंद रस्ते, पथदीप, अतिक्रमण, अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतुकीला होत असलेला खोळंबा, घंटागाड्या तसेच कायदा व सुरक्षेच्या प्रश्नांवरून उद्योजकांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पैसे घेतल्याशिवाय घंटागाड्या कचरा उचलत नसल्याचे अनेकांनी निदर्शनास आणले. दरम्यान उद्योजकांचे सर्व प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. (Nashik)
व्यासपीठावर आयमा अध्यक्ष ललित बूब,सरचिटणीस प्रमोद वाघ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, मूलभूत सेवा समिती चेअरमन कुंदन डरंगे,बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, एमआयडीसीचे उपअभियंता नितीन पाटील,जे.पी.पवार, रावसाहेब मते,वाहतूक विभागीय प्रमुख देवीदास वांजळे, चुंचाळे पोलीस चौकीचे निरीक्षक मनोहर कारंडे आदी होते. (Nashik)
(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या सभेसाठी काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्र सदन, सावरकर स्मारक आणि बाळासाहेबांचे स्मृतिस्थळही बॅनरने झाकले)
अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहत परिसरातील बंद असलेले पथदीप आणि घंटागाड्यांबाबत उद्योजकांनी संताप व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. घंटागाड्यांच्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी आयमाचे सहसचिव हर्षद बेळे यांनी केली. पैसे दिल्याशिवाय कचरात उचलला जात असल्याच्या तक्रारी ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र कोठावदे यांच्यासाह अनेक उद्योजकांनी यावेळी केल्या. पथदिपांच्या प्रश्नावरूनही उद्योजक आक्रमक दिसले. औद्योगिक वसाहतीतील अनेक पोल अति जीर्ण झाले असून ते त्वरित बदलावे अशी मागणी रवींद्र झोपे यांच्यासह अनेकांनी केली असता 120 ते 130 नवीन पोल उभारण्याचे काम युद्ध पातळीवरून हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या विद्युत खात्याचे अधिकारी रवीं सोनार यांनी सांगितले.घंटागाडी चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्यात सांगण्यात येणार. लोकांच्या मागण्या रास्त असून औद्योगिक वसाहतीतील रस्ते व पार्किंगच्या समस्यांबाबत सर्व यंत्रणांना विश्वासात घेऊन चर्चेद्वारे मार्ग काढू,असे वाहतूक विभागीय अधिकारी देविदास वांजळे यांनी सांगितले.सिंहस्थ निधीतून औद्योगिक वसाहतीतील त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे आयमा अध्यक्ष ललित बूब यांनी यावेळी सुचविले.एमआयडीसीचे उपअभियंता नितीन पाटील यांनी यावेळी एमआयडीसीतर्फे करण्यात औद्योगिक वसाहतीत करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. अतिक्रमण हटविण्यासंदर्भात महापालिका आणि पोलीस यांच्याबरोबर संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अंबड येथील ट्रक टर्मिनसचे काम प्रगतीपथावर आहे. सिएट समोरच्या अरुंद पुलाबाबत महापालिकेशी संपर्क साधला असून रुंदीकरणाच्या कामास तत्वतः मान्यता मिळाली आहे.निमा व आयमाच्या पुढाकाराने एसटीपी उभारण्यास अंबड आणि सातपूर येथील प्रत्येकी दोन एकर भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत.अमृत दोन योजनेअंतर्गत महापालिकेच्या पुढाकाराने हे काम सुरू होईल असे सुतोवाचही पाटील यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community