Prasar Bharati: नवनीत कुमार सहगल प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष

281
Prasar Bharati: नवनीत कुमार सहगल प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष

सेवानिवृत्त सनदी अधिकारी नवनीत कुमार सहगल यांची प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षांपासून हे पद रिक्त होते. यापूर्वी ए. सूर्य प्रकाश या पदावर होते. त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2020 मध्ये संपला होता. (Prasar Bharati)

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 15 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी नवनीत कुमार सहगल यांची प्रसार भारती बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रभावी असेल.

(हेही वाचा – Manipur: शिबिरांमध्ये राहणाऱ्यांनाही मतदानाची परवानगी, निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती )

देशातील सार्वजनिक प्रसारकांच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदासाठी निवड समितीचे ते प्रमुख आहेत. या समितीमध्ये प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेला एक सदस्य असतो. या बैठकीला प्रेस कॉऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना देसाई आणि माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.