“मोदी काय आहेत हे शोधण्यासाठी तुमची संपूर्ण टीम लावा. त्यांना ते शोधून काढू द्या. तुम्ही २०२९ ला अडकलात, मी तर २०४७ ची तयारी करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ नंतरच्या निवडणुकांबाबतही सकारात्मक भाष्य करून तेच पुढेही भाजपाचेच सरकार सत्तेत राहणार असल्याचे सूचक वक्तव्य केले. विशेष म्हणजे शनिवारी, १६ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा झाली आणि त्याच दिवशी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी असे वक्तव्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) १६ मार्च रोजी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच आगामी निवडणुकीबाबत भाकीत केले. जेव्हा मी अशा कॉन्क्लेव्हला जातो तेव्हा माझ्याकडून हेडलाइन्सची अपेक्षा केली जाते. पण मी डेडलाइनवर काम करणारा व्यक्ती आहे, हेडलाईनवर नाही, असा टोलाही मोदींनी लगावला. देशातील स्टार्टअप्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचेही पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) सांगितले. १० वर्षांपूर्वी जवळपास १०० स्टार्टअप्स होते. आता १.२५ लाख स्टार्टअप्स नोंदणीकृत आहेत. भारतातील स्टार्टअप ६०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये आहेत, ज्यात देशाच्या क्षेत्रफळाचा ९० टक्के वाटा आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
सर्वाधिकवेळा ईशान्येकडील राज्यांत दौरा केला
२०१४ पासून त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी ६८० वेळा ईशान्येकडील राज्यांना भेटी दिल्या आहेत, मी, पंतप्रधान म्हणून देशाच्या इतर सर्व पंतप्रधानांनी केलेल्या एकत्रित दौऱ्यांपेक्षा ईशान्येकडील राज्यांना जास्त भेटी दिल्या आहेत, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community