Kalpana Chawla : जाणून घ्या अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कल्पना चावला यांच्याबद्दल

कल्पनाचे सुरुवातीचे शिक्षण "टागोर बाल निकेतन"मध्ये झाले. कल्पना आठवीत असताना, तिला इंजिनीयर व्हायचे होते. मग तिच्या पालकांनीही तिला प्रोत्साहन दिले. ती लहानपणापासून अंतराळात जाण्याचे स्वप्न पाहत होती.

416
Kalpana Chawla : जाणून घ्या अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कल्पना चावला यांच्याबद्दल

कल्पना चावला (Kalpana Chawla) हे नाव सर्वपरिचित आहे. ती एक भारतीय-अमेरिकन अंतराळवीर होती. तसेच स्पेस शटल मिशन तज्ञ आणि अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला होती. कोलंबिया स्पेस शटल दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. कल्पना चावलाचा जन्म भारतातील हरियाणामधील कर्नाल येथे १७ मार्च १९६२ रोजी झाला. तिच्या वडिलांचे नाव बनारसी लाल चावला आणि आईचे नाव संज्योती देवी असे होते. घरी सगळे तिला प्रेमाने मोंटू हाक मारत.

(हेही वाचा – PM Narendra Modi : “मी तर २०४७ ची तयारी करतोय” – पंतप्रधान मोदींचं सूचक विधान)

अतिशय मेहनती आणि कल्पक :

कल्पनाचे (Kalpana Chawla) सुरुवातीचे शिक्षण “टागोर बाल निकेतन”मध्ये झाले. कल्पना आठवीत असताना, तिला इंजिनीयर व्हायचे होते. मग तिच्या पालकांनीही तिला प्रोत्साहन दिले. ती लहानपणापासून अंतराळात जाण्याचे स्वप्न पाहत होती. ती अतिशय मेहनती आणि कल्पक होती. १९८८ मध्ये तिने नासाच्या एम्स रिसर्च सेंटरसाठी ओव्हरसाइट मेथड्स इंकचे उपाध्यक्ष म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

(हेही वाचा – PM Narendra Modi : “मी तर २०४७ ची तयारी करतोय” – पंतप्रधान मोदींचं सूचक विधान)

१९ नोव्हेंबर १९९७ मध्ये पहिली अंतराळ मोहीम :

ती १९९५ मध्ये NASA च्या (Kalpana Chawla) अंतराळवीर कॉर्पमध्ये सामील झाली आणि १९९७ मध्ये पहिल्या उड्डाणासाठी तिची निवड करण्यात आली. तिची पहिली अंतराळ मोहीम १९ नोव्हेंबर १९९७ रोजी स्पेस शटल कोलंबिया फ्लाइट एसटीएस-८७ वर होती. तिच्या पहिल्या मिशनमध्ये तिने ६५ लाख मैलांचा प्रवास केला आणि ३६५ तासांत पृथ्वीभोवती २५२ प्रदक्षिणा घातल्या.

(हेही वाचा – Rubber Band : १७ मार्च आजच्या दिवशी निर्माण झाला होता रबर बॅंड!)

दुसरा अवकाश प्रवास हा तिचा शेवटचा प्रवास ठरला :

कल्पना चावलाचा (Kalpana Chawla) दुसरा अवकाश प्रवास हा तिचा शेवटचा प्रवास ठरला. अंतराळ यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर परतीच्या वेळी घडलेली भीषण घटना घडली. १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना विघटित झाले आणि कल्पना चावलासह सर्व अंतराळवीरांना वीर मरण आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.