आज म्हणजेच रविवार १७ मार्च रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शिवतीर्थावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह मविआचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.
(हेही वाचा- Rubber Band : १७ मार्च आजच्या दिवशी निर्माण झाला होता रबर बॅंड!)
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्सवरून काय म्हटलंय पाहुयात..
शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता. (Chandrashekhar Bawankule)
(हेही वाचा- PM Narendra Modi : “मी तर २०४७ ची तयारी करतोय” – पंतप्रधान मोदींचं सूचक विधान)
याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली. (Chandrashekhar Bawankule)
‘‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,‘‘ असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही का करीत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दाखवणार का? वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी (Rahul Gandhi) अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे. (Chandrashekhar Bawankule)
शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता.
याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय… pic.twitter.com/2Ye71yOJTF
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 17, 2024
(हेही वाचा- Manoj Jarange : “..तर सरकारला धडा शिकवला जाईल”)
आज ‘न्याय यात्रेची’ नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी याच शिवतीर्थावर येणार आहेत. आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? हाच प्रश्न आहे. (Chandrashekhar Bawankule)
वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे विसरले असतील तर काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते ते ऐकाच! (Chandrashekhar Bawankule)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community