भाजपाकडून Rahul Gandhi यांचा निषेध

Rahul Gandhi मंदबुद्धी, चीनी चाकर, हिंदूद्रोही: अतुल भातखळकर

302
Rahul Gandhi विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; भाजपाकडून मॅच फिक्सिंगच्या आरोपांची गंभीर दखल
Rahul Gandhi विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; भाजपाकडून मॅच फिक्सिंगच्या आरोपांची गंभीर दखल

स्वातंत्र्यवीर सावरकर (swatantryaveer savarkar) यांचा अवमान केल्याप्रकरणी कॉँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) माफी मागणार का? असा प्रश्न विचारणाऱ्या ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या महिला पत्रकार साखी गिरि यांना शनिवारी १६ मार्च २०२४ रोजी कॉँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. या घटनेचा महाराष्ट्र भाजपाने निषेध केला असून पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच हेच का कॉँग्रेसचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य? असा खडा सवालही केला. (Rahul Gandhi)

(हेही वाचा- Delhi Liquor Policy Scam Case : के. कविता यांना ७ दिवसांची ईडी कोठडी)

कॉँग्रेसचा दुटप्पीपणा

भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर शाब्दिक हल्ला करत सवाल केला की, “एकीकडे राहुल गांधी आणि काँग्रेस ‘मोहब्बत की दुकान’ची बात करतात आणि अशा हिंसक पद्धतीने वागतात, हा दुटप्पीपणा नाही का? दिल्लीतही एका पत्रकाराला ‘क्लाएन्ट जर्नलिझम’ असे म्हणून त्यांनी हिनवले होते. तसेच जयराम रमेश यांनी एका पत्रकाराला ‘असे प्रश्न विचारू नका’ असा दम भरला होता. पार्लमेंटच्या बाहेरही असंच एका पत्रकाराचा अपमान करण्यात आला होता. काँग्रेस (Congress) आणि राहुल गांधी यांची ही असंस्कृत हुकूमशाही वाढली आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणण्याचाच हा प्रकार आहे, हेच यावरून सुचवते,” असे भातखळकर यांनी म्हटले.  (Rahul Gandhi)

मंदबुद्धी, चीनी चाकर

भातखळकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ची बातमी ‘X’ वर पोस्ट करत कॉँग्रेसचा खरा चेहेरा उघड केला. ते म्हणाले, “मंदबुद्धी, चीनी चाकर, हिंदूद्रोही राहुल गांधी यांच्या समर्थकांचा आणखी एक कारनामा. हिंदुस्तान पोस्टच्या महीला पत्रकाराला धक्काबुक्की. हेच असते का अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य???”  (Rahul Gandhi)

(हेही वाचा- Saina Nehwal : एका महिन्यात तिसर्‍यांदा प्रथम क्रमांक मिळवणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल)

काँग्रेस गरीब आणि महिला विरोधी

भाजपाचे (BJP) प्रदेश प्रवक्ते पंकज मोदी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा निषेध करत म्हटले, “सुरुवातीपासूनच काँग्रेस गरीब आणि महिलांच्या विरोधी आहे. महिलांबाबत कॉँग्रेसला कसलाही कळवळा नाही तर केवळ तसा दिखावा करतात. ज्या-ज्या वेळी काँग्रेसच्या विरोधात कोणीही प्रश्न विचारला तेव्हा त्या पत्रकारांना गोदी-मीडिया म्हणून डिवचले. हे आता नवं नाही.” (Rahul Gandhi)

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याचा हा केवळ दिखावा आहे,” असे सांगतानाच याच आंबेडकर यांना कॉँग्रेसने (Congress) एकेकाळी दादर मध्ये लोकसभा निवडणुकीत पाडले होते याची आठवण मोदी यांनी करून दिली. (Rahul Gandhi)

(हेही वाचा- Chandrashekhar Bawankule : बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का?)

सावरकर महान क्रांतिकारक

“काँग्रेसची भूमिका कायमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात राहिली आहे. सावरकर इतके महान क्रांतिकारक होते की काँग्रेसच्या सगळ्यांनी मिळून जी शिक्षा भोगली नसेल तेवढी शिक्षा एकट्या सावरकर यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भोगली आहे. त्यामुळे सावरकरांबाबत प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराला कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा मी आणि माझा पक्ष निषेध करतो. आणि या घटनेचा जेवढा निषेध करू तेवढा कमीच आहे, असे मोदी म्हणाले. (Rahul Gandhi)

महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. (Rahul Gandhi)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.