तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि भारत राज्य समितीच्या (बीआरएस) आमदार के. कविता (K. Kavita) यांना दिल्लीतील एका न्यायालयाने आज, शनिवारी ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. (Delhi Liquor Policy Scam Case)
(हेही वाचा – Manoj Jarange : “..तर सरकारला धडा शिकवला जाईल”)
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी (Delhi Liquor Policy Scam Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना १६ मार्च रोजी हैदराबाद येथून अटक केली होती. त्यांना येत्या २३ मार्च पर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का?)
नेमकं प्रकरण काय ?
दिल्लीच्या आता बंद पडलेल्या उत्पादन शुल्क धोरणाचा (Delhi Liquor Policy Scam Case) फायदा घेण्यासाठी आम आदमी पक्षाच्या (आप) प्रमुख नेत्यांसोबत कट रचल्याचा के. कविता यांच्यावर आरोप आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, कविताच्या वकिलाने सांगितले की, हे “अत्याचाराचे क्लासिक प्रकरण” आहे. ईडीने शुक्रवारी संध्याकाळी कविता (K. Kavita) यांना त्यांच्या हैदराबादच्या घरातून अटक केली. मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीत उतरल्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले, तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ईडीने के कविता यांना समन्स जारी केल्यानंतर जवळपास २ महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Saina Nehwal : एका महिन्यात तिसर्यांना प्रथम क्रमांक मिळवणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल)
गेल्या वर्षी या प्रकरणी (Delhi Liquor Policy Scam Case) त्यांची तीनदा चौकशी करण्यात आली आणि केंद्रीय एजन्सीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे जबाब नोंदवले. दरम्यान ईडीच्या समन्सनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शनिवारी (१६ मार्च) दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर झाले होते. दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित २ तक्रारींमध्ये कोर्टाने नंतर त्यांना जामीन मंजूर केला. (K. Kavita)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community