Narendra Modi: लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच मोदींना परदेशातून पाठिंबा, ‘या’ देशात काढण्यात आली भव्य रॅली

युकेतील ओव्हरसीज फ्रेंडसने कार रॅलीच आयोजन करून भरतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शवला आहे.

324
Narendra Modi: लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच मोदींना परदेशातून पाठिंबा, 'या' देशात काढण्यात आली भव्य रॅली

देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत ७ टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. भारताबाहेरही निवडणुकीच्या तयारीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी भाजपाच्या युकेतील ओव्हरसीज फ्रेंडसकडूनही निवडणुकीच्या तयारीला वेग आल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शवण्यासाठी लंडनमध्ये एका कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. युकेतील ओव्हरसीज फ्रेंडसने कार रॅलीच आयोजन करून भरतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शवला आहे. या रॅलीची सुरुवात नॉथॉल्ट येथील कच्छ लेवा पाटीदार समाज संकुलापासून झाली आणि नियाडेन येथील BAPS स्वामीनारायण मंदिर येथे समारोप झाला.

‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, एकता आणि उत्साह दर्शवण्यासाठी सांस्कृतिक प्रदर्शनांसह रॅलीची सुरुवात झाली. देशातील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भाजप आणि पंतप्रधान मोदींना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवणाऱ्या या रॅलीमध्ये २५० हून अधिक कार सहभागी झाल्या होत्या. रॅलीत सहभाग घेतलेल्या ब्रिटनमधील सदस्यांनी भारतीय तिरंगा तसेच भाजपचे झेंडे हातात घेतले होते.

या कार रॅलीमध्ये भाग घेऊन, यूकेचे संसदपटू आणि पद्मश्री बॉब ब्लॅकमन यांनी कार रॅली लंडनमधील BAPS स्वामीनारायण मंदिरात संपल्यानंतर भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केले. त्यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व आणि त्यांच्या मातृभूमीचे भविष्य घडवण्यात भारतीय समुदायाची महत्त्वपूर्ण भूमिका यावर भर दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.