शशी कपूर (Actor Shashi Kapoor) यांनी व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले, मात्र त्यांच्या व्यावसायिक भूमिका लोकप्रिय ठरल्या. तरी ते एक दमदार अभिनेते होते. शशी कपूर हे अभिनेते होतेच, त्याचबरोबर ते चित्रपट निर्मातादेखील होते. विशेष म्हणजे त्यांना ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि २ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
शशी कपूर यांनी अनेक इंग्रजी-भाषेतील आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे वडील सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांचं नाव पृथ्वीराज कपूर. शशी कपूर यांचे खरे नाव बलबीर राज कपूर असे होते, मात्र चित्रपटासाठी त्यांनी शशी कपूर हेच नाव वापरले.
(हेही वाचा – Mahadev Betting App : माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल; एफआयआरमध्ये २१ जणांचा समावेश)
यशस्वी चित्रपटांमध्ये बालकलाकार
कपूर कुटुंब हे आजही कलासृष्टीत मोलाचं योगदान देत आहे. शशी कपूर राज कपूर आणि शम्मी कपूर यांचे सर्वात धाकटे भाऊ होते. अभिनेता त्रिलोक कपूर हे त्यांचे मामा होते. त्यांनी १९४० च्या दशकाच्या शशिराज नावाने लहानपणीच चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. संग्राम, समाधी आणि आवारा यासारख्या काही अत्यंत यशस्वी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून ते झळकले होते. त्यानंतर त्यांनी १९६१ मध्ये यश चोप्रा यांच्या धर्मपुत्र या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली.
कला क्षेत्रात भरीव योगदान
१९६५ मध्ये ‘वक्त’ आणि ‘जब जब फूल खिले’ या दोन चित्रपटांमुळे त्यांची ओळख लोकांना पटली. यानंतर कन्यादान, शर्मिली आणि आ गले लग जा हे चित्रपटही खूप चालले. १९७४ मध्ये चोर मचाये शोर या चित्रपटातून त्यांनी स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केले. पुढे त्यांनी मुख्य अभिनेत्यासह सह-कलाकाराची भूमिकाही चांगली वठवली. ‘दिवार’मधला ‘मेरे पास मां है’ हा त्यांचा डायलॉग आजही प्रसिद्ध आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने २०११ मध्ये पद्मभूषण आणि २०१४ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community