ऐन लोकसभा निवडणुकीत कोयता गॅंगने डोकं वर काढल्यामुळे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. इंदापूरमध्ये कोयता गँगने एका व्यक्तिची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना शनिवारी (१६ मार्च) घडली तसेच काही अल्पवयीन मुलंही कोयता गँगमध्ये सहभागी झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळ बालगुन्हेगारीला (Juvenile Delinquency Act) आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – Bharat Jodo Nyaya Yatra: आता भाजपाच्या डोक्यात हवा गेलीय, उद्धव ठाकरेंची टिका)
पालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
पुणे पोलीस आयुक्त जुवेनाइल अॅक्टचा वापर करणार आहेत. मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा, २०१५ या कायद्यानुसार, आता संबंधित मुलांचे आईवडील आणि पालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. विशेष करून कोयत्याने गुन्हेगारीकडे वळू पाहणाऱ्या अल्पवयीन मुलांना परावृत्त करण्यासाठी पालकांच्या जबाबदारीबरोबरच कायद्यानेही काळजी घेण्याचे ठरवले आहे. जुवेनाइल एक्टमधील कठोर कलमांचा फारसा वापर पोलीस करत नसायचे. पण पुणे शहरांच्या झोपडपट्ट्यांमधून फोफावणारी बालगुन्हेगारी रोखायची असेल तर या कायद्याची कठोर अंमलबजावणी ही करावीच लागेल, असं मत पुणे पोलिसांच्या क्राईम मिटिंगमधे नोंदवलं गेलं. त्यानुसारच हा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. (Juvenile Delinquency Act)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community