Bharat Jodo Nyay Yatra: इंडि आघाडीतील सर्व पक्ष एकत्र जमूनही शिवाजी पार्कात गर्दी जमली नाही, खुर्च्या होत्या रिकाम्याच

सभेला सुरुवात होईपर्यंत मैदानाचा परिसर रिकामाच होता आणि उद्धव ठाकरे यांचे आगमन जाहीर सभेच्या ठिकाणी झाल्यानंतर उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी जमा होऊ लागले.

972
Bharat Jodo Nyay Yatra: इंडि आघाडीतील सर्व पक्ष एकत्र जमूनही शिवाजी पार्कात गर्दी जमली नाही, खुर्च्या होत्या रिकाम्याच
Bharat Jodo Nyay Yatra: इंडि आघाडीतील सर्व पक्ष एकत्र जमूनही शिवाजी पार्कात गर्दी जमली नाही, खुर्च्या होत्या रिकाम्याच

विशेष प्रतिनिधी, मुंबई

भारत जोडो न्याय यात्रेवेळी (Bharat Jodo Nyay Yatra) समारोपाच्या जाहीर सभेत देशभरातील १५ पक्षांच्या इंडि आघाडीच्या नेत्यांनी हजेरी लावल्यानंतरही प्रत्यक्षात राहुल गांधी यांना काही बाळासाहेबांच्या गर्दीचा उच्चांक मोडता आलेला नाही. राहुलच्या सभेसाठी शिवसेना उबाठा पक्षाने आपल्या शिवसैनिकांची गर्दी या मैदानावर जमा करूनही सभेचे हे मैदान रिकामेच राहिल्याचे दिसून आले. काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेससह कम्युनिस्ट पक्ष आदींचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होऊनही हे मैदान भरले नाही. उलट उद्धव ठाकरे यांचे भाषण संपताच शिवसैनिक उठून निघून गेले, ते राहुल गांधी यांचे भाषणही ऐकायला थांबले नाहीत, असे दिसून आले.

राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे रुपातर इंडि आघाडीच्या सभेमध्ये झाले. या सभेसाठी मोठ्या संख्येने काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीसह शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते; परंतु इंडि आघाडीच्या घटक पक्षांची ही निवडणुकीच्या पूर्वीची शक्ती प्रदर्शनाची ही सभा असतानाही त्यांना सर्व पक्ष एकत्र येऊनही शिवाजी पार्क भरता आलेले नाही. सभेला सुरुवात होईपर्यंत मैदानाचा परिसर रिकामाच होता आणि उद्धव ठाकरे यांचे आगमन जाहीर सभेच्या ठिकाणी झाल्यानंतर उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी जमा होऊ लागले. राहुल गांधी यांच्या या सभेला उच्चांकी गर्दी करण्याचा प्रयत्न करूनही इंडि आघाडीतील पक्षाला मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानात गर्दी जमवता आली नव्हती.

 #EXCLUSIVE : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा सभेला रिकाम्या खुर्च्या.

…तरीही सभेचे मैदान रिकामेच
मैदानात गर्दी जमवण्यासाठी कंत्राटी कामगारांची मदत कम्युनिस्ट पक्षाने घेतली होती, तर आदिवासी समाजातील महिला मुलाबाळांना घेऊन या सभेसाठी आल्या होत्या तसेच झोपडपट्टीमधील महिलाही मोठ्या प्रमाणात बसेसमधून दाखल झाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसने आपल्या परीने इथून तिथून गर्दी जमवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही उबाठा शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केल्यानंतरही सभेचे मैदान रिकामचे राहिले. विशेष म्हणजे उबाठा शिवसेनेचे सर्व विभागप्रमुख हे गर्दी जमवण्यासाठी जातीने लक्ष ठेवून होते, परंतु काँग्रेसच्या या सभेसाठी निष्ठावान शिवसैनिक काही गेलेला नाही. त्यामुळे सर्व पक्ष एकत्रित येईनही ही गर्दी जमवता न आल्याने एकप्रकारे इंडि आघाडीचे मोठे अपयश मानले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.