माढा लोकसभा (Madha Lok Sabha Election 2024) मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजीनाट्य चालू आहे. रणजित निंबाळकर यांना दिलेल्या उमेदवारीवरून विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite Patil) नाराज आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मनधरणी करण्यासाठी गिरीश महाजन हेही १७ मार्च रोजी अकलूजमध्ये दाखल झाले होते. तेही हलबल होऊन परतले आहेत. (Madha Lok Sabha)
आता खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) हे आपली ताकद दाखवणार आहेत. खासदार रणजित निंबाळकर यांनी १८ मार्च रोजी टेम्भूर्णी येथील आमदार संजयामामा शिंदे (Sanjaymama Shinde) यांच्या फार्म हाऊसवर सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली असून यासाठी सहा पैकी पाच आमदार उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय मोहिते पाटील यांचे सर्व विरोधकही या बैठकीस उपस्थित रहाणार आहेत.
(हेही वाचा – Nitin Gadkari : नितीन गडकरींचे पंतप्रधानपदाविषयी उघड वक्तव्य; म्हणाले…)
आमदार उपस्थित रहाणार
माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील, माण खटाव येथील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढाचे राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे, करमाळा येथील राष्ट्रवादी आमदार संजयामामा शिंदे आणि माळशिरस येथील भाजप आमदार राम सातपुते हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे.
भाजप कात्रीत
मोहिते पाटील यांना पक्षाने विधानपरिषदेचे सदस्यत्व दिले आहे. शंकर सहकारी साखर कारखान्याला मोठे आर्थिक पॅकेज दिले आहे. याशिवाय माळशिरस तालुक्यातील विकासकामांसाठी भरीव निधी दिल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. आमच्या दृष्टीने विजयसिंह मोहिते पाटील यांचे पक्षात मोठे स्थान असून त्यांची नाराजी आम्हाला परवडणारी नसल्याचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले आहे. केंद्रीय समितीने दिलेले तिकीट बदलण्याची नामुष्की आली, तर राज्यभरात अनेक ठिकाणी ही मागणी होऊ शकते.
शरद पवारांचा फायदा होण्याची शक्यता
गेल्या वेळी रणजित निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्या सहकार्याने खासदारकी मिळविली होती. नंतरच्या काळात मोहिते पाटील यांच्या मनाविरुद्ध रणजित निंबाळकर यांनी त्यांच्या विरोधात गेल्यावेळी निवडणूक लढवलेले संजयामामा शिंदे यांच्याशी जवळीक साधल्याने मोहिते पाटील समर्थकांत नाराजी होती. मोहिते पाटील यांच्या नाराजीमुळे माढ्यासोबत सोलापूर, बारामती, सातारा या लोकसभा मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजप कात्रीत सापडला आहे. मोहिते यांना नाराज केल्यास याचा फायदा शरद पवार उठवू शकणार आहेत. (Madha Lok Sabha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community