Election Commission of India : निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर सहा राज्यांतील गृहसचिवांना हटवले

192
काँग्रेस, भाजपाला Election Commission ची नोटीस
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणुकीची घोषणा करताना ज्या अधिकाऱ्यांना ३ वर्षे पूर्ण झाली असतील त्यांना ताबडतोब हटवा, असे आदेश दिले आहेत. त्याचा फटका मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना बसला आहे. तसेच सहा राज्यांतील गृहसचिवांनाही हटवण्यात आले आहे.
आयोगाने अनेक राज्यांमधील उच्चपदस्थ ब्युरोक्रॅट्सच्या बदलीचे आदेश दिले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील सचिवांना निवडणूक आयोगाने हटवले आहे. मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखांच्या घोषणेनंतर आयोगाने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवत ज्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षे पूर्ण केली आहेत किंवा त्यांच्या मूळ गावी तैनात आहेत त्यांची बदली करण्यात यावी, असे सांगितले होते.

राज्य सरकारचा प्रस्ताव फेटाळला

सनदी अधिकाऱ्यांना निवडणूक कर्तव्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याच्या आधारे सूट देण्यात आल्याचे समजते. मात्र, सनदी अधिकाऱ्यांनाही हटवण्यात यावे, असे निवडणूक आयोगाने (Election Commission of India) स्पष्ट केले. सरकारने निवडणूक आयोगाकडे जात सनदी अधिकारी कायम ठेवावेत, ते मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतलेले आहेत जे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहेत असे म्हटले होते. मात्र, हा प्रस्ताव फेटाळला गेल्याने राज्य सरकारला झटका बसला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.