Indian Navy : अरबी समुद्रात मालवाहू जहाजाचे अपहरण करणाऱ्या समुद्री चाच्यांना भारतीय नौदलाने शिकवला धडा; ३५ चाच्यांचे आत्मसमर्पण

सोमालियन चाच्यांनी हे जहाज १४ डिसेंबर रोजी अपहरण करून ठेवले होते. अनेक दिवस अपहरण करून ठेवणाऱ्या चाच्यांकडे बेकायदेशीर शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि प्रतिबंधित वस्तूंचा साठा होता.

751
भारतीय नौदलाची (Indian Navy) युद्धनौका INS कोलकाताने अरबी समुद्रात मालवाहू जहाजाचे अपहरण करणाऱ्या सर्व ३५ सोमाली चाच्यांना शनिवार, १७ मार्च रोजी आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. तसेच जहाजावरील १७ क्रू सदस्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. ही कारवाई भारतीय नौदलाचे भारतीय नौदलाने (Indian Navy) विशेष दल, मरीन कमांडो फोर्स उर्फ मार्कोस यांनी केली.

१४ डिसेंबर रोजी जहाज अपहरण करून ठेवलेले 

भारतीय किनाऱ्यापासून जवळजवळ १,४०० nm (२,६०० किमी) अंतरावर MV Ruen या जहाजाला समुद्री चाच्यांनी रोखले होते. त्यावेळी नौदलाचे INS सुभद्रा, सागरी गस्ती विमान आणि MARCOS कमांडो यांनी समुद्री चाच्यांच्या जहाजाला थांबण्यास भाग पाडले. हे जहाज १४ डिसेंबर रोजी सोमालियन चाच्यांनी अपहरण करून ठेवले होते. अनेक दिवस अपहरण करून ठेवणाऱ्या चाच्यांकडे बेकायदेशीर शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि प्रतिबंधित वस्तूंचा साठा होता. शुक्रवार, २२ मार्च रोजी भारताच्या आंतरराष्ट्रीय समुद्रीसीमेवर या समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलावर (Indian Navy) गोळीबार केला. त्यानंतर लागलीच सक्रिय झालेल्या नौदलाने समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. तसेच अपहरण केलेले मालवाहू जहाज आणि ओलीस ठेवलेल्या १७  नागरिकांची सुटका करण्यात आली.

१७ घटनांची नोंद 

समुद्री चाच्यांनी वैद्यकीय कारणास्तव एका ओलिस क्रू सदस्याची आधी सुटका केली. जहाजातील क्रूमध्ये अंगोला, म्यानमार आणि बर्मुडा येथील नागरिकांचा समावेश होता. सोमालीया चाच्यांनी या आठवड्यात सोमालियाच्या किनारपट्टीवर बांगलादेशचा ध्वज असलेले मालवाहू जहाज ताब्यात घेण्यासाठी व्यापारी जहाजाचा वापर केला असावा, असे युरोपियन युनियन नौदल दलाने (Indian Navy) गुरुवारी सांगितले. सोमाली चाचे २०१७ पासून व्यापारी जहाजाचे अपहरण करू शकले नाहीत. डिसेंबरपासून भारतीय नौदलाने अपहरण, अपहरणाचा प्रयत्न किंवा संशयास्पद दृष्टिकोनाच्या किमान १७ घटनांची नोंद केली आहे. चाच्यांविरूद्ध सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारताने जानेवारीमध्ये लाल समुद्राच्या पूर्वेला किमान डझनभर युद्धनौका तैनात केल्या आणि २५० हून अधिक जहाजांची तपासणी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.