Mahayuti बेबनाव, BJP कडून ऐनवेळी उमेदवार बदलण्याची शक्यता

ज्या जागांवर महायुतीत एकमत झालेले नाही, त्यात प्रामुख्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई यासह एकूण १०-११ मतदार संघांचा समावेश आहे.

269
Mahayuti : अजित पवार नमती भूमिका घेणार; फक्त ७५ जागांची मागणी

भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीमध्ये अद्याप जागावाटपावरून एकमत होत नाही. भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ज्या उमेदवारांची नावे आहेत त्यांनाही स्थानिक पातळीवरून विरोध होत असल्याचे दिसून येत असून यातील काही नावे ऐन निवडणुकीआधी बदलली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. (Mahayuti)

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपाचा दावा

ज्या जागांवर महायुतीत एकमत झालेले नाही, त्यात प्रामुख्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई यासह एकूण १०-११ मतदार संघांचा समावेश आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ शिवसेनेकडे असला तरी भाजपाने या जागेवर दावा केला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव भाजपाकडून पुढे केले जात आहे. तर शिवसेनेचे राज्यातील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास आग्रही असल्याने अद्याप यावर तोडगा निघू शकला नाही. (Mahayuti)

नाशकात युतीधर्म पाळत नसल्याचा आक्षेप

त्याचप्रमाणे नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी परस्पर जाहीर केल्याने वादाला तोंड फुटले. नाशिकमधून गोडसे यांना उमेदवारी देण्यास स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध असून गोडसे हे युतीधर्म पाळत नसल्याचा आक्षेप भाजपाकडून घेण्यात येत आहे. २०१४ पूर्वी नाशिक मतदार संघ भाजपाकडे होता मात्र २०१४ आणि १०१९ पासून हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. (Mahayuti)

(हेही वाचा – Indian Premier League : इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्याची तारीख ठरली, कसं कराल ऑनलाईन बुकिंग; वाचा सविस्तर…)

कोल्हापुरात शिवसेना-भाजपा आमने-सामने

कोल्हापूर मतदार संघातही महायुतीत आलबेल नसल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदार संघ म्हणून कोल्हापूरच्या जागेकडे पहिले जाते. एकीकडे महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना या मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी केली असताना भाजपा आणि शिवसेनेत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे स्थानिक खासदार संजय मंडलिक यांना भाजपापकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. या ठिकाणी भाजपाचे एक पदाधिकारी संग्रामसिंह कुपेकर यांनी उघड विरोध करण्यास सुरुवात केली आहे. अशीच काहीशी परिस्थिती ठाणे, सातारा, संभाजी नगर, रामटेक, परभणी, दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मतदार संघातही आहे. (Mahayuti)

शेवटच्या क्षणी उमेदवार बदलू शकतो

तर दुसरीकडे माढा मतदार संघातून भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली असूनही त्यांच्या उमेदवारीला भाजपाकडूनच विरोध होत आहे. कॉँग्रेसमधून भाजपावासी झालेले विजायसिंह मोहिते-पाटील हे उमेदवारीवरून नाराज आहेत. अशाप्रकारे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरून विरोधाचा सूर ऐकू येत असल्याने भाजपाकडून शेवटच्या क्षणी उमेदवार बदलण्यात येऊ शकतो, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. भाजपाने पहिली २० उमेदवारांची यादी नुकतीच जारी केली असून काही ठिकाणी विरोधही सुरू झाला आहे. (Mahayuti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.