प्रकाश आंबेडकर ‘इंडि’ आघाडीत फूट पाडणार? ‘फ्युचर इंडिया’आडून DMK ला केले जातेय लक्ष्य!

या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक रोख्यांचा विषय जोरदारपणे मांडला. त्यावेळी व्यासपीठावर DMKचे नेते, मुख्यमंत्री स्टॅलिन उपस्थित होते.

137

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा झाली. त्यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक रोख्यांचा विषय भाषणात घेतला. ज्या फ्युचर इंडिया कंपनीचे प्रॉफिट २०० कोटी रुपये आहे, त्या कंपनीने १३०० कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोखे कसे दिले?, असा प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे १३०० कोटींच्या बॉण्ड्सपैकी ५३१ कोटीचे बॉण्ड्स हे DMK या पक्षाला देण्यात आले आहेत. यावरून आता इंडि आघाडीतील घटक पक्षच DMKला अडचणीत आणत आहेत, असे चित्र दिसत आहे.

…आणि स्टॅलिन यांची झाली गोची

या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक रोख्यांचा विषय जोरदारपणे मांडला. त्यावेळी व्यासपीठावर DMKचे नेते, मुख्यमंत्री स्टॅलिन उपस्थित होते. फ्युचर इंडियाने दिलेल्या निवडणूक रोख्यांचा विषय काढून आंबेडकर यांनी थेट इंडि आघाडीतच फूट पाडली आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणामुळे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुक पक्षाची आणि व्यासपीठावर असलेले स्टॅलिन यांची गोची झाली. कारण प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकर यांनी उल्लेख केलेल्या फ्युचर गेमिंग कंपनीने द्रमुकला सर्वाधिक म्हणजे ५३१ कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे भाजपाऐवजी डीएमके आणि एम. के. स्टॅलिन हेच अडचणीत आले आहेत. लॉटरी किंग सॅंटियागो मार्टिन फ्युचर गेमिंग ही कंपनी १,३६८ कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची सर्वात मोठी खरेदीदार आहे. तिने सर्वाधिक देणगी द्रमुकला दिली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी स्टॅलिन व्यासपीठावर उपस्थित असतानाच केलेले हे वक्तव्य इंडि आघाडीत मीठाचा खडा टाकणारे तर ठरणार नाही ना, अशी चर्चा होत आहे.

(हेही वाचा Rahul Gandhi : राहुल गांधी यांची लायकी काय? रणजित सावरकर यांनी सुनावले खडेबोल)

विशेष म्हणजे इंडि आघाडीतील उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत हेही प्रकाश आंबेडकर यांचीच री ओढत DMKला अप्रत्यक्ष अडचणीत आणत आहेत. राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणात इलेक्टोरल बॉन्डचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकर यांचा मुद्दा पुढे नेला. एकूणच इंडि आघाडीतील पक्षच आपला मित्र पक्ष डीएमकेला अडचणीत आहेत. त्यामुळे इंडि आघाडीत फूट पडण्याच्या दिशेनेच ही वक्तव्य होत असल्याचे दिसत आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.