Sameer Wankhede : माझ्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह खरे नायक, बाकी मी कोणाला मानत नाही

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ही माझ्या आयुष्यातील सर्वात छोटी केस होती. पण लोकांना ती फार महत्त्वाची वाटली. त्यावेळी मला कोणीच विचारलं नाही की आधी तीन हजार केस केल्या होत्या. आतापर्यंत १७ हजार किलो ड्रग्ज पकडले आहेत, देशासाठी रक्त वाहिलं आहे. त्यावेळी त्या रक्ताचा रंग कोणता हे कोणी विचारलं नाही.

226
Sameer Wankhede : माझ्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह खरे नायक, बाकी मी कोणाला मानत नाही

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना मी मानतो. तसेच ते खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी आहेत. बाकी बॉलिवूड स्टार्स माझ्यासाठी सेलिब्रिटी नाहीत,” असं विधान समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी केलं आहे.

(हेही वाचा – Raj Thackeray : मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले …)

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी ‘aakar Digi9’च्या प्रभाकर सूर्यवंशी यांना दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड स्टार्स, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले समीर वानखेडे ?

बॉलिवूडचे अभिनेते माझ्यासाठी अजिबात सेलिब्रिटी नाहीत. माझी सेलिब्रिटीची व्याख्या वेगळी आहे. बाबा आमटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे तसेच आजच्या काळातले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह माझ्यासाठी हे सगळे खरे नायक आहेत. बाकीच्यांना मी अजिबात सेलिब्रिटी किंवा नायक मानत नाही. (Sameer Wankhede)

(हेही वाचा – Nitin Gadkari : पॉवर पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही; सध्याच्या राजकारणाविषयी काय म्हणतात नितीन गडकरी)

बाकी कोणाला मी मानत नाही :

पुढे बोलताना वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले की; “माझ्यासाठी माझं संविधान, माझे कायदे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या केसेस या माझ्यासाठी खूपच नॉर्मल आहेत. मी कायद्याचं पालन करतो. त्यामुळे मला कोणत्या गोष्टीची भीती वाटत नाही. मी कोणाला घाबरत नाही. मला फक्त दोन लोकांना तोंड दाखवायचं आहे. माझी राष्ट्रआई भारतमाता आणि माझ्या खऱ्या आईला. बाकी कोणाला मी मानत नाही.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.