दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. १९ एप्रिलपासून १ जूनपर्यंत एकूण सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक होणार आहे. याच वातावरणात आता तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी राजीनामा दिला आहे. तमिळनाडू भाजपाच्या माजी प्रदेश अध्यक्ष राहिलेल्या सौंदरराजन (Tamilisai Soundararajan) यांनी लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवण्यासाठी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे, अशी चर्चा चालू आहे. (Telangana Governor)
(हेही वाचा – Ravikant Tupkar : माझे गुरु शरद जोशी, राजू शेट्टींची भूमिका तळ्यात-मळ्यात; रविकांत तूपकर यांची स्पष्टोक्ती)
राजभवनने प्रसारित केले निवेदन
यासंदर्भात तेलंगणा राजभवनाने निवेदनात प्रसारित केले आहे. “तेलंगणाचे नायब राज्यपाल डॉ.श्रीमती तमिलिसाई सौंदरराजन यांनी आपला राजीनामा दिला आहे. हा राजीनामा भारताच्या माननीय राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्यात आला आहे”, असे राजभवनने निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वीही लढवली होती निवडणूक
नागर समुदायातील सौंदरराजन यांनी २०१९ मध्येही लोकसभा निवडणूक लढवली होती. डीएमकेच्या कनिमोळी यांच्याकडून थुथुकुडीमध्ये सौंदरराजन यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांनी तमिळनाडू (Tamil Nadu) विधानसभेची निवडणूकदेखील ३ वेळा लढवली. त्यांनी २००६ मध्ये राधापूरमधून, २०११ मध्ये वेलाचेरी आणि २०१६ मध्ये विरूगंपक्कमधून निव़डणूक लढवली होती. तीनही वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
भाजपाच्या तिसऱ्या उमेदवारांच्या यादीत सौंदरराजन यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्या तामिळनाडूतील पाँडिचेरी उत्तर मतदारसंघ किंवा चेन्नईमधील दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Telangana Governor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community