पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानात (Pakistan Afghanistan Conflict) हवाई हल्ले केले. टीटीपीच्या दहशतवाद्यांचा नाश करणे हा या हवाई हल्ल्यामागील मुख्य हेतू होता. अफगाणिस्ताननेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी हवाई दलाने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील खोस्त आणि पाकित्का प्रांतातील भागांना लक्ष्य केले.
(हेही वाचा – Nitin Gadkari : पॉवर पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही; सध्याच्या राजकारणाविषयी काय म्हणतात नितीन गडकरी)
दोन वेगवेगळ्या भागात हल्ले :
पाकिस्तानी हवाई दलाने (पी. ए. एफ.) तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टी. टी. पी.) च्या कमांडरच्या घराला लक्ष्य करून हा हल्ला केला. हवाई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी लष्कराने दोन वेगवेगळ्या भागात हल्ले केले आहेत. (Pakistan Afghanistan Conflict)
या हल्ल्यात अफगाणिस्तानचे (Pakistan Afghanistan Conflict) जवळ जवळ ८ जवान शहीद झाले होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, ठार झालेले दहशतवादी हाफिज गुलबदार गटाशी संबंधित होते.
(हेही वाचा – Sameer Wankhede : माझ्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह खरे नायक, बाकी मी कोणाला मानत नाही)
प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने हा एअर स्ट्राईक केला :
या हवाई हल्ल्याच्या जवळपास दोन दिवस आधी अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या वझिरिस्तान भागातील लष्करी चौकीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानचे ७ जवान शहीद झाले. याच हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने हा एअर स्ट्राईक केल्याचं सांगितलं जात आहे. (Pakistan Afghanistan Conflict)
(हेही वाचा – Ravikant Tupkar : माझे गुरु शरद जोशी, राजू शेट्टींची भूमिका तळ्यात-मळ्यात; रविकांत तूपकर यांची स्पष्टोक्ती)
या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराच्या माध्यम शाखेने या घटनेचा तपशील शेअर केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, १६ मार्चच्या सकाळी दहशतवाद्यांच्या एका गटाने वझिरिस्तानमधील लष्करी चौकीवर हल्ला केला. मात्र, दहशतवाद्यांचा हा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. (Pakistan Afghanistan Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community