Rahul Gandhi : राहुल गांधींच्या सभेत चोरांची एन्ट्री, सभेसाठी आलेल्या अनेकांचे मोबाईल फोन्स लांबवले

मुंबईतील दादर शिवाजी पार्क मैदानात रविवारी काँग्रेस पक्षाची 'भारत जोडो न्याय यात्रा'ची सांगता सभा संपन्न झाली. या सभेत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातुन काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तसेच इंडी आघाडीच्या देशभरातील नेत्यांनी या सभेसाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

385
Rahul Gandhi विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; भाजपाकडून मॅच फिक्सिंगच्या आरोपांची गंभीर दखल
Rahul Gandhi विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; भाजपाकडून मॅच फिक्सिंगच्या आरोपांची गंभीर दखल
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत चोरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. या चोरांनी गर्दीचा फायदा घेत अनेकांचे मोबाईल फोन्स लांबवले आहे. मोबाईल फोन्स चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी रविवारी रात्री सभा संपल्यानंतर अनेकांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडे धाव घेत मोबाईल चोरीच्या तक्रारी दाखल केल्या. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी चोरट्याविरुध्द गुन्हे दाखल केले असून मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी देखील नोंदविण्यात आलेल्या आहेत. (Rahul Gandhi)
मुंबईतील दादर शिवाजी पार्क (Dadar Shivaji park ) मैदानात रविवारी काँग्रेस पक्षाची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ची (Bharat Jodo Nyay Yatra shivaji park rally)सांगता सभा संपन्न झाली. या सभेत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी (congress Leader Rahul Gandhi) यांच्यासह देशभरातुन काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तसेच इंडी आघाडीच्या देशभरातील नेत्यांनी या सभेसाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. देशभरातील नेते, हजारो कार्यकर्त्यांसह या सभेत चोरट्यानी देखील आपली उपस्थिती दर्शवली होती. परंतु चोरट्यांची उपस्थिती सभा ऐकण्यासाठी नव्हती तर सभेसाठी येणाऱ्याचे खिशे रिकामे करण्यासाठी होती. (Cellphone stolan)
सभेसाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन या चोरट्यानी अनेकांच्या खिशात हात घालून मोबाईल फोन्स लांबवले आहे. घाटकोपर पश्चिम असल्फा व्हिलेज येथे राहणारे गायक विष्णू शिंदे आणि कमलाकर शेजुळे हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा ऐकण्यासाठी शिवाजी पार्क येथे आले होते,सभा संपल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले असता दोघांच्या खिशातील मोबाईल फोन्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. विष्णू शिंदे यांचा अप्पल कंपनीचा ७० हजार किमतीचा मोबाईल फोन आणि कमलाकर शेजुळे यांचा विवो कंपनीचा मोबाईल फोन चोरीला गेला, विष्णू शिंदे आणि शेजुळे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली.(Cellphones stolen at Bharat Jodo Nyay Yatra shivaji park rally) दरम्यान घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारे रमेश जाधव यांचा सभेच्या ठिकाणी १ लाख रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरट्यानी लांबवला. तसेच अनेकांनी मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. (Mumbai Police)
शिवाजी पार्क पोलिसांनी सभेच्या ठिकाणी झालेल्या मोबाईल चोरी आणि गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या चोराच्या टोळीला शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, वृत्त वाहिन्यांच्या कॅमेराच्या फुटेजची मदत घेत आहे. (Rahul Gandhi)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.