Nupur Sharma : राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नूपुर शर्मा; सोशल मीडियावर चर्चा

Nupur Sharma : गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायबरेलीचीही जोरदार चर्चा होत आहे. भाजपाकडून उमेदवार म्हणून प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे नावही चर्चेत आहे.

324
Nupur Sharma : राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नूपुर शर्मा; सोशल मीडियावर चर्चा
Nupur Sharma : राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नूपुर शर्मा; सोशल मीडियावर चर्चा

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. (Loksabha Election 2024) सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. 2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याची तयारी भाजप करत आहे आणि त्यासाठी उमेदवारांच्या निवडीबाबत भाजपामध्ये चर्चा सुरू आहे. सोमवार, 18 मार्च रोजी संध्याकाळी दिल्लीत भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. (Nupur Sharma)

नुपूर शर्मा यांची रायबरेलीतून चर्चा

कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर उत्तर प्रदेशचे राजकारणही तापले आहे. भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता दुसऱ्या यादीतील उमेदवारांची चर्चा सुरू आहे. गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायबरेलीचीही जोरदार चर्चा होत आहे. भाजपाकडून उमेदवार म्हणून प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे नावही चर्चेत आहे. नुपूर शर्मा या महंमद पैगंबरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ती वादात सापडल्या होत्या.

(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधींच्या सभेत चोरांची एन्ट्री, सभेसाठी आलेल्या अनेकांचे मोबाईल फोन्स लांबवले)

सोशल मीडियावर सक्रिय

सध्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा गांधी कुटुंबाच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नूपुर शर्मा यांना रायबरेलीतून तिकीट देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या निवडीची बातमी व्हायरल होऊ लागली आहे.

रायबरेली (Raebareli) हा नेहमीच गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे. 2004 पासून सोनिया गांधी ही जागा जिंकत आहेत. या वेळी सोनिया गांधी यांनी येथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी राज्यसभेत गेल्या आहेत. प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसमधून होत आहे. (Nupur Sharma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.