सोमवार, 18 मार्च रोजी रालोआने (NDA) बिहारमधील लोकसभेच्या (Loksabha Election 2024) 40 जागांसाठी तिकीट वाटपाची घोषणा केली. भाजप (BJP), जेडीयू, एलजेपी (रामविलास), राष्ट्रीय लोक मोर्चा आणि एचएएममध्ये जागा विभागल्या गेल्या. त्याचबरोबर पशुपती कुमार पारस (Pashupati Paras) यांचा पक्ष राष्ट्रीय लोजपला यात एकही जागा मिळालेली नाही. महायुतीत त्यांच्या पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे ते नाराज आहेत.
(हेही वाचा – Thane Drugs : ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; २७ कोटींचा अमली पदार्थांचा माल जप्त)
हाजीपूरमधूनच निवडणूक लढवणार
पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ‘एनडीएमध्ये माझ्यावर अन्याय झाला’, असे ते म्हणाले; आता मी ठरवेन कुठे जायचे, अशी घोषणा पारस यांनी मंगळवार, १९ मार्च रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. पशुपती पारस यांनी यापूर्वीच हाजीपूरमधून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
पुतणे चिराग पासवान यांना जागावाटपात स्थान
2019 मध्ये हाजीपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकून पशुपती पारस खासदार झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना त्यांच्या मंत्रीमंडळात स्थान दिले आणि त्यांना केंद्रात मंत्री केले. पण, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांचे पुतणे चिराग पासवान यांना पसंती देत काका पशुपती कुमार पारस यांच्याकडे थेट दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. (Bihar)
(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधींच्या सभेत चोरांची एन्ट्री, सभेसाठी आलेल्या अनेकांचे मोबाईल फोन्स लांबवले)
हा भाजप आणि पशुपती कुमार पारस यांच्यातील वाद – जेडीयू
भाजपचे केंद्रीय नेतृत्व घटक पक्षांशी संवाद साधत होते, त्यात जेडीयूची कोणतीही भूमिका नव्हती. चिराग पासवान यांच्यासह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय घेतला. पशुपती कुमार पारस यांचा निर्णय काय आहे आणि ते कुठे जात आहेत, हे फक्त तेच सांगू शकतात. नितीशकुमार यांनी सर्वांचा आदर केला आहे. भाजप आणि पशुपती कुमार पारस यांच्यातील हा वाद आहे, असे जेडीयूचे नेते नीरज कुमार यांनी याविषयी सांगितले आहे. (Pashupati Paras)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community