Navjot Singh Sidhu : आता आयपीएलच्या मैदानात घुमणार नवज्योतसिंग सिद्धू यांचा आवाज

नवज्योतसिंग सिद्धूंची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १५ वर्षे चालली. १९८३ ते १९९८ या काळात त्यांनी ५१ कसोटी आणि १३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत ३२०३ आणि एकदिवसीय सामन्यात ४४१३ धावा केल्या.

210
Navjot Singh Sidhu : आता आयपीएलच्या मैदानात घुमणार नवज्योतसिंग सिद्धू यांचा आवाज

भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) पुन्हा एकदा समालोचनाकडे म्हणजेच कॉमेंट्रीकडे वळले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आता आयपीएल २०२४ मध्ये त्यांच्या आवाजाची जादू अनुभवता येणार आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२४ च्या कॉमेंट्री लिस्टमध्ये सिद्धूंचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Pashupati Paras : पशुपती पारस यांचा केंद्रीय मंत्रीमंडळातून राजीनामा; बिहारमध्ये जागावाटपात डावलल्याचा आरोप)

आयपीएल प्रसारक स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियावर नवज्योतसिंग सिद्धूच्या (Navjot Singh Sidhu) समालोचन पॅनेलमध्ये समावेशास दुजोरा दिला आहे. आयपीएलच्या या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे.

नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. नुकतेच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर आता नवज्योतसिंग सिद्धू क्रिकेटच्या मैदानात परतले आहेत.

(हेही वाचा – Share Market: शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान; कारण? वाचा सविस्तर…)

२०१९ मध्ये द कपिल शर्मा शोमधून बाहेर पडल्यानंतर कॉमेंट्रीपासून दूर असताना सिद्धू (Navjot Singh Sidhu) वादात अडकले होते. नवज्योतसिंग सिद्धूंची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १५ वर्षे चालली. १९८३ ते १९९८ या काळात त्यांनी ५१ कसोटी आणि १३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत ३२०३ आणि एकदिवसीय सामन्यात ४४१३ धावा केल्या. तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १५ शतके आणि ४८ अर्धशतकेही झळकावली. (Navjot Singh Sidhu)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.