भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग विकास आघाडीच्या (Divyang Vikas Aghadi ) कार्यकारिणीची घोषणा प्रदेश भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे संयोजक जयसिंग चव्हाण यांनी केली. प्रदेश सहसंयोजकपदी हर्षल साने, डॉ. खुशी मोहमद अंसारी तसेच विशेष निमंत्रित म्हणून राजेंद्र पुरोहित व निमंत्रित म्हणून संजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिव्यांगांच्या २१ विविध प्रवर्गांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन विभागवार प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. दिव्यांगांच्या विकासासाठी कार्य करणा-या व्यक्तिंचा समावेशही कार्यकारिणीत करण्यात आला आहे, असे चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.
(हेही वाचा – Nupur Sharma : राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नूपुर शर्मा; सोशल मीडियावर चर्चा )
Join Our WhatsApp Community