मथुरा श्री कृष्ण जन्मभूमी वादाशी (Mathura Krishna Janmabhoomi) संबंधित १५ खटले एकत्र करून त्यांची एकत्रित सुनावणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मस्जिद समितीने विरोध केला होता. त्याला आव्हान देणारी मुसलमानांची याचिक सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार, १९ मार्च रोजी फेटाळली. हे प्रकरण उच्च न्यायालयातच ठेवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे बांधण्यात आलेल्या शाही इदगाह मशिदीबाबतचा वाद जुना आहे, त्यावर उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. मथुरा जिल्हा न्यायालयाकडून सर्व प्रकरणे उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याविरुद्ध मशिदीच्या बाजूची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मशीद समितीच्या त्या याचिकेवर एप्रिलमध्ये सुनावणी होणार आहे. आजचे प्रकरण १८ पैकी १५ प्रकरणे एकत्रित करण्याच्या विरोधात होते. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप केलेला नाही. न्यायालयात या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत मशीद समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगण्यात आले आहे. (Mathura Krishna Janmabhoomi)
(हेही वाचा Nupur Sharma : राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नूपुर शर्मा; सोशल मीडियावर चर्चा)
हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने शाही इदगाह मशिदीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.” उच्च न्यायालयाने कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मस्जिद वादाशी संबंधित १५ प्रकरणे एकत्रित सुनावणीसाठी एकत्रित केली आहेत. ते म्हणाले, आज शाही इदगाह मशीद समिती त्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आली होती. (Mathura Krishna Janmabhoomi)
Join Our WhatsApp Community