Marathi Style Saree : कधीही नेसा, छान दिसा; मराठी साड्या – पिढ्यानपिढ्याची फॅशन

199
Marathi Style Saree : कधीही नेसा, छान दिसा; मराठी साड्या - पिढ्यानपिढ्याची फॅशन
Marathi Style Saree : कधीही नेसा, छान दिसा; मराठी साड्या - पिढ्यानपिढ्याची फॅशन

मराठी म्हणजेच महाराष्ट्रीयन साड्या (Marathi Style Saree) कोणत्याही पारंपारिक प्रसंगी तुम्ही नेसू शकता. मराठी साड्यांच्या (marathi style saree) विविध प्रकारांतून समृद्ध महाराष्ट्रीय कला आणि संस्कृतीचे दर्शन होते. या साड्यांची भव्यता, थाट आणि सौंदर्य यामुळेच त्यांना संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळाली आहे.

खरंतर मराठी साड्या (Marathi Style Saree) म्हणजे नऊवारी… नऊवारी म्हणजे साडीला येणारे नऊ वार असतात. ही साडी नेसण्याची एक विशिष्ट पद्धत असते. मुळात ही साडी नेसण्यासाठी एक प्रकारे कसब आणि प्रशिक्षणही लागतं. प्रत्येक नऊवारी नेसण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि ती पद्धत अंगवळणी पाडावी लागते. शेतात किंवा इतर कामं करणाऱ्या महिला ही नऊवारी साडी घोट्याच्या वर किंवा गुडघ्यापर्यंत नेसतात. तर सणा समारंभाला ही साडी गुडघ्याच्या खालपर्यंत नेसली जाते. तर आता आपण जाणून घेऊया, मराठी साड्यांचा प्रकार (Marathi Style Saree)

नारायण पेठ साडी

महाराष्ट्रातील लग्नामध्ये (Marathi Style Saree) नारायण पेठ साडी नेसण्याची पद्धत आहे. ही साडी नेसायला अगदीच सोपी आहे. नारायण पेठ या साडीचा काठ सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ही साडी पाचवार, सहावार आणि नऊवार या तिन्ही प्रकारात मिळते. लग्नामध्ये मिरवण्यासाठी किंवा करवली बनून उभं राहण्यासाठी ही साडी उत्तम आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: राज्यातील राजकारणाला वेग, राज ठाकरे दिल्लीत तर अजित पवार फडणवीसांच्या बंगल्यावर)

शालू असलेली साडी

लग्नांमध्ये नवरी शालू नेसण्याला प्राधान्य देते. मराठी लग्नांत (Marathi Style Saree) नवरी म्हटली की ती शालूत दिसायला हवी जणू अशी परंपराच आहे. गडद रंगाचा हा शालू थोडा जड असतो. तरीही शालूची साडी नेसणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं.

काठापदराची साडी

काठापदराची सिल्क साडी समारंभात मिरवण्यासाठी उत्तमच आहे. या साडीमध्ये मुलींचं सौंदर्य आणि पावित्र्य अधिक खुलून येतं.. एक छान पारंपारिक आणि त्यातच थोडासा मॉडर्न लूकही दिसून येतो. यामुळे भावनाही जपली जाते आणि फॅशनही पाळली जाते.

पेशवाई साडी

ही नऊवारी साडी असून ब्राह्मणी पद्धतीप्रमाणे नेसली जाते. यामध्ये ४-५ इंचाचा ओचा काढला जातो. सुरूवातीच्या काळामध्ये पेशवाई नऊवारी साडी नेसण्यासाठी भरजरी साड्यांचाच वापर केला जात होता. पण आता हलक्या आणि सहज वावरायला जमणार्‍या साड्या पसंत केल्या जातात.

(हेही वाचा – Bharat Jodo Nyay Yatra : राहुलबाबाची सभा ठरणार इंडि आघाडीच्या गोतास काळ…)

पैठणी

होम मिनिस्टर, होम मिनिस्टर… पैठणी साडीचा विषय निघाला की आपल्याला झी मराठीवरील आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आठवतो. पैठणी साडी ही खूपच प्रसिद्ध, त्यात बांदेकरांनी एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. पैठणी साडीशिवाय मराठी लग्न पूर्ण शकत नाही. पैठणीचेही अनेक प्रकार आहेत. जरतारी असणारी पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी. पण कोणताही प्रकार निवडा. ही साडी नेसून राजेशाही थाट प्राप्त होतो.

खणाची साडी

मराठी पद्धतीची (Marathi Style Saree) खणाची साडी सगळ्यात भारी राव! फ्युजन लूक किंवा मराठमोळ्या लूक मध्ये ही साडी नेसू शकता. खणाची साडी हा महाराष्ट्रीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे. खूप आधीपासून ही साडी आपल्याकडे नेसली जाते. आता आधुनिकीकरणासह अनेक बदल झाले असले तरी त्यातला सांस्कृतिकपणा नष्ट झालेला नाही.

तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा अशा मराठी पद्धतीच्या साड्या (Marathi Style Saree) आता विकत घेणार ना? अहो, आपली संस्कृती आपणच टिकवायची असते. नाही का?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.