लग्नसराईचे (Marriage Wedding Stage Decoration) दिवस जवळ आले की, साड्या, दागदागिने आणि इतर अनेक वस्तूंच्या खरेदीला उधाण येतं; पण हल्ली एका मुख्य विषयाकडेही लक्ष वेधलं जाऊ लगालं आहे…ते म्हणजे ‘लग्न समारंभ सभागृहाची सजावट’!
थीम काय असावी? थीम ट्रेंडी आहे का? आणि ती इंटरेंस्टिंग कशी बनवाल? वगैरे अनेक प्रश्न पडतात. हल्ली तर वेडिंग डेस्टिनेशनही होतात. मेंदी, हळद, संगीत…इत्यादी अनेक कार्यक्रम दररोज साजरे होतात. रोज वेगवेगळ्या पद्धतीने सजावट केली जाते. जागेचे सुशोभिकरण, रंगसंगती कशी निवडायची? जागा सुशोभित कशी करायची? अशा अनेकविध बारीकसारीक मुद्द्यांचा सभागृह सजावटीअंतर्गत केले जातो. लग्न समारंभासारखा आयुष्यातील महत्त्वाचा सोहळा अविस्मरणीय व्हावा, याकरिता सभागृह सजावटींच्या विविध कल्पना जाणून घेऊया –
एंगेजमेंट पार्टी
विवाह सोहळ्याशी आयुष्यातील अनेक भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे हा सोहळा घरी, बागेत किंवा मोठ्या सभागृहात साजरा करण्याचा विचार करत असला, तर वेळेनुसार, बजेटनुसार, हलक्या पेस्टल रंगाचे कर्टन्स (पडदे), नैसर्गिक भरपूर सूर्यप्रकाश यांचा विचार करायला हवा. गुलाबी, निळा, हिरवा, नारंगी, केशरी अशा रंगांच्याही पडद्यांच्या शेड्स वापरू शकता तसेच सोनेरी, चंदेरी, शाही गुलाबी या रंगाची सजावट रात्रीच्या वेळी आकर्षक दिसते.
दिवे आणि फुलांची सजावट
कार्यक्रमांसाठी दिवे आणि फुले हीदेखील सजावटीची उत्तम कल्पना आहे. बाजारात यासाठी भरपूर पर्याय आहेत. कृत्रिम फुले, तंबूसाठी दोन किंवा अधिक रंग निवडले असल्यास, सजावट आकर्षक दिसू शकते. रात्रीच्या सजावटीकरिता आवडीचे विविधरंगी दिवे, आकर्षक छत, फुलांच्या माळा, कृत्रिम तारे, स्नोबॉल आणि सेंटिलिटर या तुमच्या एंगेजमेंट लाइट्ससोबत जोडण्यासाठी उत्कृष्ट वस्तू आहेत.
पाहुण्यांच्या टेबलाची सजावट
पाहुण्यांचे टेबल, स्टेज एरियामागील पार्श्वभूमी, प्रवेशद्वार आणि इकडे तिकडे काही रिकाम्या जागा असतात. त्या शोभिवंत वस्तूंनी कशा भरता येतील, याचा विचार करा. याकरिता सजवण्यासाठी सेंटरपीसपासून फोटोजेनिक कोपऱ्यांपर्यंत इत्यादी बाबींचा बारकाईने विचार करावा लागतो.
जागा काढून टाकण्यासाठी तुम्ही फुले, भांडी किंवा मध्यम आकाराचे काहीही ठेवू शकता. दिवसापासून रात्रीपर्यंत, घराबाहेर किंवा घरातील सजवलेली भिंतही इतरांना आकर्षित करते.
रॉयल लूकसाठी…
आकर्षक, शोभिवंत दिवे, एखादे शिल्प, प्रवेशद्वाराची सजावट, याकरिता दिवे, समारंभात स्वागत करणाऱ्या फुलांचे गुच्छ, क्लासिक मोर, पेन, विविध प्रकारच्या फुलदाण्या, आणि एखादे सुंदर पेंटिंग भिंतीला लावून ठेवू शकता.
हळदी, मेहंदी आणि लग्नाच्या आधीचे दिवस
लग्नापूर्वीच्या समारंभांसाठी सभागृहाची सजावट करण्याबरोबर कर्णमधुर संगीत किंवा एखाद्या संगीताची धून यामुळेही समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांना प्रसन्न वाटते. त्यामुळे कोणते संगीत, गाणी लावावीत याचाही विचार करा. सजावटीसाठी फुलांव्यतिरिक्त विविध पाने, कंदील इत्यादींचा वापर करू शकता.
रिंग समारंभ
सजावटीसाठी फ्लफी पडदे जोडणे, वेगळा लूक दिसण्यासाठी सावली आवश्यक असते. गोलाकार स्टेजचे सेटिंग निवडू शिकता. रात्री अतिशी नृत्याचा आनंद घेऊ शकतात. फॅन्सी क्रिस्टल स्टेज, नाचण्यासाठी आणि डीजेसाठी पुरेशी जागा असल्याची खात्री करा.
रिसेप्शन आणि लग्न
रिसेप्शन हा भारतीय विवाहसोहळ्यांचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो नवविवाहित जोडप्याचा आणि दोन कुटुंबांच्या मिलनाचा उत्सव साजरा करतो. क्रिस्टल झुंबर, भरपूर मेणबत्त्या आणि परी दिव्यांची चमक या सजावटीचा वातावरणावर परिणाम होतो. मोठ्या फुलांच्या मनमोहक माळा, चमकदार आणि रंगीबेरंगी ड्रेप्स, सजावटीचे बॅनर, कंदील, कागदी सजावट, फॅन्सी दिवे, परी दिवे यामुळे सोहळा आनंदी व्हायला मदत होईल.