राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावरुन गोंधळ सुरू आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातदेखील गेले आहे. मंगळवारी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणूक आयोग आणि अजित पवार गटाला काही सूचना दिल्या आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले. (Lok Sabha Election 2024)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ( दि. १९ मार्च ) महत्त्वपूर्ण आदेश दिला. ‘तुतारी’ हे चिन्ह शरद पवार गटासाठी राखून ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले तसेच आगामी लोकसभा (Lok Sabha Election 2024) आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असून निकालाच्या अधीन असल्याचे अजित पवार गटाने जाहीरपणे जाहीर करावे, असे अंतरिम निर्देशही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने दिला.
अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी आणि पक्षाचे चिन्ह वाटप करण्याच्या निवडणूक (Lok Sabha Election 2024) आयोगाच्या ६ फेब्रुवारीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शरद पवार गटाने दाखल केलेल्या विशेष याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
(हेही वाचा – Ashish Shelar : भाजपा मुंबईत ‘अब की बार चारसो पार’चा नारा बुलंद करणार; गुढीपाडव्याला हिंदुत्वाची गुढी उभारण्याचे आवाहन)
चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असून निकालाच्या अधीन…
आजच्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने घड्याळ चिन्ह कोणालाही देवू नये, अशी मागणी केली. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे आता आम्हाला यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही, मात्र अजित पवार गटाने प्रचाराच्या सर्व जाहिरातींवर त्यांना दिलेले घड्याळ चिन्हाखाली प्रकरण न्यायप्रविष्ट असून निकालाच्या अधीन आहे, असे जाहीर करावे. त्यामुळे आता अजित पवार गट लोकसभा निवडणुकीसाठी घड्याळ हे चिन्ह वापरू शकतो, मात्र हे चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असून निकालाच्या अधीन असल्याचे त्यांना जाहीर करणे बंधनकारक असणार आहे.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘राष्ट्रवादी अजित पवार गटाने वृत्तपत्रांमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी आवृत्त्यांमध्ये एक जाहीर सूचना जारी करावी. यामध्ये ‘घड्याळ’ चिन्हाचे वाटप न्यायप्रविष्ट आहे, अशी घोषणा अजित पवार गटाच्या वतीने जारी केलेल्या प्रत्येक टेम्पलेट, जाहिराती, ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिपमध्ये असावी.’ ‘तुतारी’ हे चिन्ह शरद पवार गटासाठी राखीव असेल.
न्यायालयाचे निर्देश…
शरद पवार गटाला लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकांसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षासह तुतारी चिन्ह वापरण्याचा अधिकार असेल, असे निर्देश न्यायालयाने दिले. यापूर्वी, भारताच्या निवडणूक आयोगाने फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवेळी हे नाव वापरण्याची परवानगी दिली होती. लाेकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकांसाठी ‘तुतारी’ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) साठी राखीव चिन्ह असेल. ते इतर कोणत्याही राजकीय पक्षाला, अपक्ष उमेदवारांना वाटू नये, असेही निर्देश न्यायालयाने मंगळवारी दिले.
Join Our WhatsApp CommunitySupreme Court interim order in Sharad Pawar vs Ajit Pawar case:
– Election Commission to provisionally recognise Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar as party for purpose of contesting upcoming Parliamentary and State elections with symbol of man blowing trumpet
— Bar & Bench (@barandbench) March 19, 2024