Ajit Pawar : श्रीनिवास पवारांच्या टीकेला बारामतीतील सुज्ञ नागरिकाचे उत्तर

श्रीनिवास पवार यांनी बारामतीच्या काठेवाडीतील ग्रामस्थांशी बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली होती.

291

पवार कुटुंबामध्ये उभी फूट पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (NCP) फूट पडली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतच शरद पवारांना आव्हान दिले आहे; लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना लोकसभेत उमेदवारी देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे बारामतीत पवार कुटुंबांतील संघर्ष समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार याचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी जाहीर सभेत बोलताना अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. आता श्रीनिवास पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर बारामतीतील सुज्ञ नागरिक नावाने पत्राद्वारे देण्यात आले आहे.

श्रीनिवास पवार यांनी बारामतीच्या काठेवाडीतील ग्रामस्थांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती. काकांनी काहीही दिले नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आतापर्यंत मी अजित पवारांचा प्रत्येक शब्द ऐकला आहे. पण त्यांचा हा निर्णय काही पटला नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेनंतर अजित पवार यांच्या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. पण आता एका पत्राद्वारे श्रीनिवास पवार यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला जात आहे. सुज्ञा बारामतीकरांचे मत या नावाने हे पत्र व्हायरल झाले आहे.

(हेही वाचा Ashish Shelar : भाजपा मुंबईत ‘अब की बार चारसो पार’चा नारा बुलंद करणार; गुढीपाडव्याला हिंदुत्वाची गुढी उभारण्याचे आवाहन)

पत्र जशास तसे

सुज्ञ बारामतीकरांचे मत

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी – खोटा सहानुभूतीदार श्रीनिवास बापू नालायक हा शब्द आपण किती सहज वापरला … पण हा शब्द वापरत असताना आपण सोईस्करपणे का विसरला आपण आजपर्यंत आपल्या बारामतीसाठी, समाजासाठी काय केले, एका बाजूला समाजा प्रति आपण काय तरी देणं लागतो, ह्याकडे डोळाझाक करून, दुसरीकडे मात्र केवळ अजित दादांचे (Ajit Pawar) छोटे बंधू म्हणून स्वतःला फक्त मिरवायचे काम केले. वास्तविक पाहता कुठलीही व्यक्ती राजकारण, समाजकारण किंवा आपला व्यवसायामध्ये स्वकर्तुत्व आणि जिद्दीच्या जोरावर आपला ठसा उमटावते, अजितदांदाकडे पाहिले तर ते सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आज अजितदादा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात, जनतेमध्ये मिसळतात त्यांची कामे मार्गी लावतात, हे बारामतीकरांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांची कबुली इतर मान्यवरांच्या बरोबर खुद्द पवार साहेबांनी वेळोवेळी दिली आहे.

बापू तुम्ही बोलताना म्हणाला की, मला पण पवार साहेबांसारखे काका मिळाले पाहिजे होते, पण तुम्ही हे विसरला की फक्त काका मिळून चालत नाही, तर त्या कसोटीला उतरण्यासाठी कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व गुण असावे लागतात. पण आज अचानक सपत्नीक पुढे येऊन अजितदादाच्या (Ajit Pawar) बद्दल जे मत व्यक्त केले आहे, त्यामध्ये कुठला तरी स्वार्थ नक्कीच लपलेला आहे, अशी शंका उपस्थित होते. कारण दादांच्या अनेक निर्णयाबरोबर आपण दादांच्या बरोबर दिसला होता. बारामतीकर म्हणून असे वाटते की, तुम्ही एकतर अजितदादांना कायम व्हीलन करणाऱ्या लोकांच्या हातातील खेळणं झाला असावे किंवा आपल्या बायको-पोरांच्या असणाऱ्या राजकीय महत्वकांक्षापोटी आपण हे पाऊल टाकले असावे. शेवटी आम्ही बारामतीकर म्हणून नक्की सांगतो की, आम्ही घोगडं भिजवत ठेवणाऱ्या खोटी सहाभूतीदार लोकांच्या मागे न उभा राहता प्रत्येक्षात विकास करणाऱ्या विकास पुरुषाच्या मागे म्हणजेच अजितदादांच्या (Ajit Pawar) मागे ठामपणे उभे राहणार आहोत.

….आणि श्रीनिवासबापू आमचं ठरलंय “घड्याळ तेच वेळ नवी”

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.