- सचिन धानजी,मुंबई
मुंबईत एम.एम.आर.डी. ए. (M.M.R.D. A.) च्या माध्यमातून मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात येत असून या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा मोबदला आता मुंबई महापालिकेकडे मागितला गेला आहे. मुंबई महापालिकेकडे (Bmc Fd) एम.एम.आर.डी. ए. ने , ५००० कोटींच्या आर्थिक मोबदल्याची मागणी केली आहे. एम.एम.आर.डी. ए. (M.M.R.D. A.) ची ही मागणी मान्य करत महापालिका प्रशासनाने त्यांना तातडीने एक हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. महापालिकेने सुमारे ९५० कोटींची एफ डी मुदतपूर्व मोडून ही रक्कम एम.एम.आर.डी. ए.ला अदा केली आहे. त्यामुळे कालपर्यंत महापालिकेचा पैसा हा इतर कामांना खर्च केला जात होता, पण आता एम.एम.आर.डी. ए.च्या कामांचा खर्चही महापालिका पेलणार आहे.त्यामुळे अशाप्रकारे पैशांची खैरात केली जाणार असेल तर महापालिकेच्या प्रकल्पांचा खर्च, कामगारांचा पगार आणि कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन द्यायला तरी पैसे राहिल का अशी भीती आता कर्मचाऱ्यांमध्ये मनात निर्माण व्हायला लागली आहे. (Bmc Fd)
(हेही वाचा- BMC Mumbai : अश्विनी भिडे आता पूर्णवेळ मुंबई मेट्रोत; मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी अमित सैनी)
एमएमआरडीएने केली ५००० कोटींची मागणी
मुंबई महानागर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी. ए.च्या माध्यमातून मुंबईत मेट्रो रेल्वेची (Mumbai Metro) कामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबई मेट्रो ३ प्रकल्प वगळता अन्य सर्व मेट्रो रेल्वेची कामे ही ‘एम.एम.आर.डी. ए.’च्यावतीने सुरू आहेत. मेट्रो रेल्वे सुविधा ही मुंबईकरांसाठी असून मुंबईकरांना मिळणाऱ्या या सेवेकरता यावर केलेला खर्चांचा २५ टक्के हिस्सा स्थानिक स्वराज संस्था म्हणून महापालिकेने पेलावा म्हणून ‘एम.एम.आर.डी. ए.’ ने महापालिकेला मागील महिन्यात पत्र पाठवून सुमारे ५ हजार कोटी रुपयांची आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली होती त्यानुसार महापालिकेने ‘एम.एम.आर.डी. ए.’ला तातडीने एक हजार कोटी रुपये तातडीने देण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासकांच्या मंजुरीने शनिवारी ही रक्कम प्राधिकरणाला अदा केली असल्याची माहिती मिळत आहे. (Bmc Fd)
(हेही वाचा- Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांची सीबीआय तपासणी होणार)
बँकेत ठेवलेल्या एफडी दहा दिवसांतच मोडल्या
विशेष म्हणजे एमएमआरडीएला ही रक्कम देण्यासाठी महापालिका प्रशासनाने मुदत ठेव असलेल्या एका मुदतठेवीपैंकी ९५० कोटी रुपयांची एक मुदतठेवीची रक्कम मुदतीपूर्वीच मोडली आणि त्यातून हा पैसा एमएमआरडीला दिला. विशेष म्हणजे एफडीची ही रक्कम ७ मार्च २०२४ रोजी महापालिकेने बँकेत ठेवली होती आणि २९ मार्च २०२५ पर्यंत याची मुदत होती. ७.९३ टक्के दराने सुमारे ९५० कोटींची केलेली ही एफडी केवळ एमएमआरडीला तातडीची बाब असल्याने अवघ्या दहा दिवसांतच मोडण्याची वेळ आली. त्यामुळे एफडी मोडून (Bmc Fd)
सुमारे एक हजार कोटींची रक्कम एमएमआरडीएला देण्यात आली असली तरी अजून ३९०० कोटी रुपये अजून दिले जाणार आहेत. आगामी अर्थसंकल्पात हा पैसा देण्यासाठी निधीची तरतूद केल्याचीही माहिती मिळत आहे. (Bmc Fd)
(हेही वाचा- भारतीय बायोकेमिस्ट आणि बायो टेक्नॉलॉजिस्ट Govindarajan Padmanabhan)
एमएमआरडीच्या ताब्यातील प्रकल्पांवर महापालिकेचा असाही खर्च
त्यामुळे एका बाजुला एका बाजुला एमएमआरडीने वाट लावलेल्या पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डेमुक्तीसाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, शिवाय आता एक्सेस कंट्रोलच्या नावाखाली सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. शिवाय एमएमआरडीएने न केलेल्या परंतु महापालिकेच्या माथी मारलेल्या दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गाच्या कामांसाठी सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या हद्दीबाहेरील कामे ही महापालिकेच्या माथी मारली जात आहेत आणि एमएमआरडीएने मेट्रोची सेवा दिली म्हणून महापालिकेच्या तिजोरीत हात घालून पाच हजार कोटींची उधळण केली जात असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांच्या उरात आणखी धडकी भरली आहे. (Bmc Fd)
(हेही वाचा- International Day Of Happiness: असा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय आनंद दिन!)
मुंबईत एकच प्राधिकरण व्हावे
एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईसह महानगरात पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले जात असल्याने मुंबईतील या प्राधिकरणाची लुडबूड बंद व्हावी आणि मुंबईत एकच प्राधिकरण असावे अशी भूमिका उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मांडली होती, परंतु ठाकरे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री बनल्यावरही त्यांना एकच प्राधिकरण मुंबईत करता आलेले नाही. आता मेट्रोच्या कामांसाठी याच एमएमआरडीएला महापालिकेकडून आर्थिक मदत केली जात आहे, याबाबत कर्मचाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Bmc Fd)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community