माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत (Madha Lok Sabha Election) गेले तीन दिवस चर्चा चालू आहे. भाजपने मोहिते पाटील यांना डावलून रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) नाराज आहेत. भाजप नेते गिरीष महाजन हेही अकलूजमध्ये जाऊन त्यांची समजूत काढून आले. (Madha)
(हेही वाचा – Bmc Fd महापालिकेच्या एफडी मोडून एमएमआरडीला दिले १००० कोटी रुपये)
मोहिते पाटील माघारीच्या मनस्थितीत नाहीत
धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षाच्या निर्णयाची वाट न पहाता प्रचारही चालू केला आहे. त्यामुळे आता मोहिते पाटील आता माघारीच्या मनस्थितीत नसल्याचे वातावरण बनू लागले आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यातून आपल्या प्रचाराला सुरूवात केल्यानंतर आता त्यांच्या परिवारातील आणखी दोन व्यक्ती प्रचारासाठी बाहेर पडले आहेत. बुधवार, २० मार्च रोजी धैर्यशील मोहिते पाटील सांगोला तालुक्याचाा दौरा करणार आहेत.
शरद पवार ही संधी सोडणार नाहीत
सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमदार शहाजीबापू पाटील हे मात्र निंबाळकरांच्या बाजूने जोरदार प्रचार करत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील जर तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्यास तयार असतील, तर उमेदवाराच्या शोधात असणारे शरद पवार ही संधी सोडणार नाहीत. आता निर्णय मोहिते पाटील यांना करायचा असून भाजपकडून उमेदवारीत बदल होणार नसेल, तर मोहिते पाटील यांना भाजप सोडून पुन्हा पवार यांच्याकडे परतावे लागणार आहे. शरद पवार यांनीच माढा मतदारसंघातील वादासाठी मोहिते पाटील यांना रसद पुरवल्याचीही चर्चा एका बाजूला चालू आहे. (Madha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community