- ऋजुता लुकतुके
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) फ्रँचाईजीमध्ये सध्या वातावरण बदललेलं आहे. रविवारी महिलांनी पहिलं वहिलं डब्ल्यूपीएल (WPL) विजेतेपद मिळवल्यानंतर पुरुषांच्या संघाने मंगळवारी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ (Guard of Honour) दिला. फ्रँचाईजीच्या स्थापनेनंतर तब्बल १६ वर्षांनी महिलांनी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी याचं मोल मोठं होतं. स्मृती मंढाणाचा संघही विजेतेपदानंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर चिन्नास्वामी मैदानात आला होता. (IPL 2024)
(हेही वाचा- WPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचाईजीने महिला खेळाडूंचं असं केलं अभिनंदन )
या संघाला पुरुषांच्या आयपीएल संघाने ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. स्मृतीच्या हातात तेव्हा आयपीएलचा करंडक होता. यानंतर मैदानात खेळाडूंनी एक रपेट मारली. चाहत्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. आणि करंडकाबरोबर फोटो सेशन केलं. (IPL 2024)
The grass is greener on our side! 😬
📍 Johnnie Walker presents #RCBUnbox powered by @kotak_life and @Duroflex_world is live #PlayBold #ನಮ್ಮRCB #WPL2024 pic.twitter.com/oBVZtH3rVp
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 19, 2024
आता महिलांनी मिळवलेल्या या यशानंतर पुरुष खेळाडूंनाही नवीन हंगाम गाजवण्याचे वेध लागले आहेत. खासकरून माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या सहकाऱ्यांना तसा प्रेमळ इशाराच दिला आहे. महिला खेळाडूंचं अभिनंदन करताना विराटने सहकाऱ्यांनाही कानपिचक्या दिल्या. (IPL 2024)
(हेही वाचा- Raj Thackeray : राज ठाकरेंनी मागितल्या दोन जागा; अमित शाह काय म्हणाले ?)
‘छान. खूपच छान. मुली खेळत होत्या तेव्हा आम्ही सगळे तो सामना पाहत होतो. असं वाटत होतं, जसं बंगळुरू शहरच जिंकतंय. प्रेक्षक आणि चाहते मागची १६ वर्षं आमच्याशी एकनिष्ठ आहेत, आमच्याशी जोडले गेले आहेत. म्हणूनच मला वाटतं, आता पुरुषांनीही त्यांना निराश करता कामा नये. जर आम्ही आयपीएल जिंकू शकलो, तर तो त्यांच्यासाठी अनमोल क्षण असेल,’ असं विराट महिलांचं अभिनंदन केल्यानंतर म्हणाला. (IPL 2024)
Virat Kohli at RCB Unbox LIVE 🤩
King Kohli speaks about 16 years of loyalty from the RCB fans, and signs off saying, “I’m always going to be here!”
This is Johnnie Walker presents #RCBUnbox powered by @kotak_life and @duroflex_world. #PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/yviF0jIZBs
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 19, 2024
इतकंच नाही तर विराटने बंगळुरू फ्रँचाईजीबद्दलची त्याची कटीबद्धताही इथं अधोरेखित केली. ‘या संघाबरोबर मी कायम असणार आहे. आयपीएल करंडक पहिल्यांदा जिंकणाऱ्या संघाचा भाग व्हावं असं मला मनापासून वाटतं. या फ्रँचाईजी आणि चाहत्यांचं मी देणं लागतो, असं मला वाटतं. महिलांनी यंदा डब्ल्यूपीएल जिंकलं, तसंच आयपीएल जिंकण्याचं माझं स्वप्न आहे. कदाचित यावर्षी तो योग जुळूनही येईल,’ असं विराट यावेळी बोलताना म्हणाला. (IPL 2024)
(हेही वाचा- Uttar Pradesh : उत्तरप्रदेशात दुहेरी हत्या करणारा धर्मांध आरोपी पोलीस चकमकीत ठार)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघात यंदा विराट कोहलीसह, फाफ दू प्लेसिस, रिकी टॉपले, मोहम्मद सिराज, कॅमेरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि कर्ण सिंग यांच्यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. (IPL 2024)