Badminton News : लक्ष्य सेनची जागतिक क्रमवारीत तेराव्या स्थानावर झेप 

Badminton News : या कामगिरीमुळे लक्ष्यच्या ऑलिम्पिक समावेशाला बळकटी मिळाली आहे 

157
Badminton News : लक्ष्य सेनची जागतिक क्रमवारीत तेराव्या स्थानावर झेप 
Badminton News : लक्ष्य सेनची जागतिक क्रमवारीत तेराव्या स्थानावर झेप 
  • ऋजुता लुकतुके

नुकत्याच संपलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचलेला लक्ष्य सेन (Lakshya Sen) जागतिक क्रमवारीतही आता पाच स्थानांची झेप घेऊन तेराव्या स्थानावर पोहोचला आहे. याचा उपयोग लक्ष्यला ऑलिम्पिक (Olympics) पात्रतेसाठी होणार आहे. कारण, एप्रिल अखेरी क्रमवारीतील पहिले १६ खेळाडू ऑलिम्पिकसाठी (Olympics) पात्र ठरणार आहेत. भारताचा आणखी एक खेळाडू एच एस प्रणॉय (H S Prannoy) पहिल्या दहांत आहे. त्यामुळे प्रणॉय आणि लक्ष्य या दोन खेळाडूंना ऑलिम्पिक पात्रतेची आशा बाळगता येईल. (Badminton News)

(हेही वाचा- IPL 2024 : ‘१६ वर्षं लागली पण…’ विराट कोहली मुलींच्या डब्ल्यूपीएल विजेतपदावर काय म्हणाला?)

बर्मिंगहॅम इथं झालेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेत लक्ष्य उपान्त्य फेरीत पोहोचला होता. लक्ष्यची सर्वोत्तम क्रमवारी ही सहा इतकी होती. पण, त्यानंतर २०२३ मध्ये त्याच्या कामगिरीतील सातत्य हरवलं होतं. पण, आता तो पुन्हा फॉर्ममध्ये परतलाय. (Badminton News)

नोव्हेंबर २०२२ मध्ये लक्ष्य सेन जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानापर्यंत पोहोचला होता. पण, तिथून त्याच्या फॉर्मला गळती लागली. पाठदुखीनेही त्याला सतावलं होतं. त्यामुळे पुढील सहा महिन्यांतच एप्रिल २०२३ पर्यंत तो २५ व्या स्थानापर्यंत घसरला. तिथून त्याने पुन्हा कमबॅकचा प्रयत्न केला. आणि ऑगस्ट २०२३ मध्ये तो दहाव्या स्थानावर आला. पण, २०२४ सालाला सुरुवात झाली तोपर्यंत तो पुन्हा विसाव्या स्थानावर घसरला.  (Badminton News)

(हेही वाचा- CAA विषयी अमेरिकन खासदाराची टीका; म्हणे, यामुळे प्रकरण आणखी बिघडेल)

अलीकडे बॅडमिंटनमधील दिग्गज भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण यांनी पी व्ही सिंधू (P V Sindhu) बरोबरच लक्ष्य सेनलाही मार्गदर्शन करायला सुरूवात केली आहे. त्यानंतर फ्रेंच ओपन आणि पाठोपाठ ऑल इंग्लंडमध्येही लक्ष्य सेनने उपान्त्य फेरीत मजल मारली. (Badminton News)

लक्ष्य बरोबरच विश्वविजेतेपद स्पर्धा आणि आशियाई क्रीडास्पर्घेत कांस्य पदक जिंकणारा एच एस प्रणॉय नवव्या स्थानावर आहे. तर किदंबी श्रीकांत २७ व्या आणि प्रियांशू राजावत ३२ व्या स्थानावर आहेत. महिलांमध्ये ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू अकराव्या स्थानावर आहे. दुहेरीत सात्त्विकसाईराज आणि चिराग यांनी आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. (Badminton News)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.