Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर गुंते निर्माण करतात; महाविकास आघाडीतील धुसफूस उघड

Prakash Ambedkar : वास्तविक वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक आहे. तसेच महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष त्यास अनुकूल आहेत. मविआतला प्रमुख पक्ष असलेल्या उबाठा गटाशी वंचितची आधीपासूनच युती आहे.

233
Sanjay Raut : वंचितने उमेदवार जाहीर करणे हे संविधानाचे दुर्दैव; संजय राऊतांची खंत

मी महाराष्ट्रातील ७ जागांवर वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळणाऱ्या कोणत्याही ७ मतदारसंघांची नावं त्यांनी आम्हाला द्यावी. त्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देईल. आम्ही तिथल्या काँग्रेस उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघात, मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देऊ, अशी मागणी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे एका पत्राद्वारे केली आहे.

(हेही वाचा – IPL 2024 : ‘१६ वर्षं लागली पण…’ विराट कोहली मुलींच्या डब्ल्यूपीएल विजेतपदावर काय म्हणाला?)

जागावाटपावरून मतभेद

वास्तविक वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक आहे. तसेच महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष त्यास अनुकूल आहेत. मविआतला प्रमुख पक्ष असलेल्या उबाठा गटाशी वंचितची आधीपासूनच युती आहे. तरीदेखील वंचितच्या महाविकास आघाडीतल्या सहभागाबाबत संभ्रम कायम आहे. जागावाटपावरून वंचित आणि मविआचे सुत जुळलेले नाही.

एकीकडे महाविकास आघाडीत सहभागी झाल्याचे वंचितने घोषित केले असले, तरी वंचित बहुजन आघाडीची स्थिती तळ्यात-मळ्यात आहे. हा पक्ष कधी महाविकास आघाडीत सहभागी झाला आहे, असे सांगितले जाते, तर कधी आंबेडकरांचे मविआबरोबरचे वाद समोर येतात आणि प्रकाश आंबेडकर सांगतात की, आमचा पक्ष अद्याप मविआचा सदस्य नाही.

ते काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार आहेत का? – संजय राऊत

वंचितने आता उबाठा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला डावलून थेट आणि केवळ काँग्रेसशी चर्चा सुरू केली आहे. याविषयी उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. प्रकाश आंबेडकरांनी एकट्या काँग्रेसला पत्र पाठवलं आणि आणि त्यांच्याकडे सात जागांची यादी मागितली आहे. त्या सात जागांवर पाठिंबा देणार वगैरे… मग उरलेल्या जागांवर त्यांचा (वंचितचा) उमेदवार उभा करून ते काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार आहेत का? प्रकाश आंबेडकर असे गुंते निर्माण करतात, वेगवेगळी कोडी टाकतात. हे प्रकाश आंबेडकरांचं रिडल्स इन पॉलिटिक्स प्रकरण आहे.आम्ही वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Prakash Ambedkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.