Wrestling Crisis : साक्षी मलिक, विनेश यांचं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साकडं

Wrestling Crisis : ब्रिजभूषण शरण यांच्यासारखी व्यक्ती कुस्तीच्या केंद्रस्थानी नको हेच साक्षी, विनेशचं सांगणं आहे 

233
Wrestling Crisis : साक्षी मलिक, विनेश यांचं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साकडं
Wrestling Crisis : साक्षी मलिक, विनेश यांचं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साकडं
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कुस्तीतील (Indian wrestling) संघर्ष काही थांबण्याचं नाव धेत नाहीए. ऑलिम्पिक असोसिएशनने (Olympic Association) कुस्ती फेडरेशनच्या निलंबित कार्यकारिणीकडे प्रशासकीय अधिकार पुन्हा एकदा बहाल करायचं ठरवल्यावर आता आंदोलनकर्त्या कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडेच धाव घेतली आहे. ‘ब्रिजभूषण सरण यांच्यासारखे शासनकर्ते कुस्तीला नकोत,’ अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. (Wrestling Crisis)

(हेही वाचा- Lok Sabha Elections 2024 : अर्ज भरण्यास सुरुवात, तरी राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा पत्ता नाही…)

या दोघींनी पंतप्रधानांना उद्देशून ट्विटरवर एक संदेशांची मालिकाच लिहिली आहे. आणि एका अर्थाने समाज माध्यमांमध्ये एक मोहीम चालवली आहे. लैंगिक अत्याचारांचा आरोप असलेल्या ब्रिजभूषण शरण यांना हटवण्याच्या मागणीपासून देशात कुस्तीपटूंचं एक आंदोलन उभं राहिलं होतं. आताही ट्विटरच्या माध्यमातून कुस्तीपटूंनी पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. (Wrestling Crisis)

दोघी एकमेकांनी लिहिलेले संदेश फॉरवर्डही करत आहेत. आणि त्यांची पुष्टी करणारे संदेश स्वत: लिहित आहेत. अलीकडेच एका संदेशात विनेशनं पंतप्रधानांना स्पिन मास्टर म्हटलं आहे. ‘पंतप्रधान हे ‘स्पिन मास्टर’ आहेत. त्यांना कुणी प्रश्न विचारल्यास ते महिला-शक्तीचा उल्लेख करून प्रश्न टोलवतात. पण, महिला शक्तीचं वास्तव त्यांना ठाऊक नाही. अल्पवयीन मुलींचं लैगिक शोषण केल्याचा आरोप असलेला ब्रिजभूषण आणि त्याची माणसं कुस्तीवर राज्य करत आहेत. आता तुम्ही महिलांचा उपयोग ढाल म्हणून न करता, देशातील क्रीडा संघटनांना अत्याचार-मुक्त कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे,’ असं विनेश या ट्विटमध्ये म्हणते. (Wrestling Crisis)

(हेही वाचा- Badminton News : लक्ष्य सेनची जागतिक क्रमवारीत तेराव्या स्थानावर झेप )

तर ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीपटू साक्षी (Sakshi Malik) मलिकनेही एका ट्विटमध्ये कुस्ती फेडरेशनचे लोक कायद्याच्या वर ते असल्याचा आव आणून काम करत आहेत, असा आरोप केला आहे. (Wrestling Crisis)

Wrestling Crisis

 

साक्षीने या ट्विटमध्ये ऑलिम्पिक असोसिएशनने संमती दिलेल्या निर्णयाची प्रतही जोडली आहे. त्यानंतर या मोठ्या संदेशात ती म्हणते, ‘अंगातील बळाच्या जोरावर ताकदवान लोक महिलांना नेहमी त्रास देत आलेले आहेत. आताही कुस्तीत तेच होतंय. महिला कुस्तीपटू सुरक्षित रहाव्या यासाठी आम्ही एक लढा उभारला. पण, प्रतिस्पर्धी इतका ताकदवान आहे की, तो पुन्हा सत्तेत येऊ पाहतो आहे. त्यांना वाटतं की ते देशाची घटना आणि न्यायमंडळापेक्षा मोठे आहेत. क्रीडा मंत्रालयाने कुस्तीची कार्यकारिणी बरखास्त करूनही ब्रिजभूषण शरण सारखी माणसं ही कारवाई दाखवण्यापूरती आहे. आम्ही परतणार आहोत, असं सांगत सुटले होते. इथेच कुस्तीची अवस्था समजून येते,’ असं साक्षी या ट्विटमध्ये म्हणते. (Wrestling Crisis)

(हेही वाचा- CAA विषयी अमेरिकन खासदाराची टीका; म्हणे, यामुळे प्रकरण आणखी बिघडेल)

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने अलीकडेच कुस्तीच्या कारभारासाठी नेमलेली तात्पुरती समिती बरखास्त करून निवडणुकीत स्थापन झालेल्या कार्यकारिणीकडे कुस्तीचा कारभार सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यकारिणीचे निवडून आलेले अध्यक्ष संजय सिंग हे लैंगिक शोषणाचा आरोप असलेले ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे साक्षी, बजरंग आणि विनेश सारख्या काही खेळाडूंचा त्यांना विरोध आहे. तर कुस्ती फेडरेशनवरील बंदी जागतिक संघटनेनं हटवलेली असल्यामुळे आता तात्पुरत्या समितीची गरज नाही, असं कारण तात्पुरती समिती हटवताना ऑलिम्पिक फेडरेशनने दिलं आहे. (Wrestling Crisis)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.