Ratnagiri: थकीत कर मोटार वाहनांचा २ एप्रिलला लिलाव

मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत जप्त करण्यात आले आहे.

335
Ratnagiri: थकीत कर मोटार वाहनांचा २ एप्रिलला लिलाव
Ratnagiri: थकीत कर मोटार वाहनांचा २ एप्रिलला लिलाव

मोटार कर न भरल्याने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव कर वसुली अधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यातर्फे येत्या २ एप्रिल रोजी ई लिलाव पद्धतीने सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या वाहनमालकांना थकीत कर भरणा कळविण्यात आल्यानंतरदेखील वाहनमालकांनी कर भरलेला नाही. त्यामुळे त्यांचा जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्या वाहनांचा वाहन क्रमांक व त्यांचा प्रकार पुढीलप्रमाणे –

MH08E6153 – A/R PASS, MH04CU9211- P/VAN, MH14AD5529- M/CYCYLE, MH08E5789- A/R PASS, MH08E6662- A/R PASS, MH08E5865- A/R PASS, MH08E0513- TATA SUMO, MH08K6444- P/VAN, MH05BJ0463- TOURIST TAXI, MH04CX4287-2 WHEELER, MH07 5909- GOODS CARRIER, MH08E0578- HYUNDAI XCENT, MH02YA3726 – D/VAN, MH07B6114- A/R PVT.

(हेही वाचा – Billiards Hall of Fame : पंकज अडवाणीचा बिलियर्ड्सच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश )

ई-लिलावाच्या तारखेपर्यंत थकीतदारांना कर भरण्याची संधी राहील. वाहनाच्या मालकांनी, ताबेदारांनी, वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत थकीत कर, पर्यावरण कर शासकीय दंडाच्या रकमेचा भरणा करून वाहने सोडवून न्यावीत किंवा लिलावात हरकत घ्यायची असल्यास १ एप्रिलपर्यंत लेखी हरकत घ्यावी. त्यानंतर काही म्हणणे नाही, असे गृहीत धरुन त्यांच्या वाहनांचा लिलाव ई-लिलाव पद्धतीने २ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत करण्यात येईल. ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा. ई-लिलावाच्या अटी व शर्तींची माहिती कार्यालयीन वेळेत उपलब्ध होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.