Lok Sabha Elections 2024 : महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच

218
Lok Sabha election 2024 :मतदानासाठी 7 मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी
Lok Sabha election 2024 :मतदानासाठी 7 मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागावर निवडणूक होणे आहे. यात नागपूर, चंद्रपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि रामटेकचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने (Bjp) पहिल्या टप्प्यातील दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. (Lok Sabha Elections 2024)
असे असले तरी, रामटेक, भंडारा आणि गडचिरोलीमधील उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाही. यातही रामटेक मतदार संघावरून भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. अशात रामटेकमधून कुणाचा उमेदवार मैदानात उतरतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Lok Sabha Elections 2024)
याउलट, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची होड लागली आहे. पहिल्या टप्यातील नागपूर,  चंद्रपूर आणि रामटेकची जागा काँग्रेस लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या तिन्ही जगावरील उमेदवार ठरविताना काँग्रेसच्या नाकी नऊ आले आहे. (Lok Sabha Elections 2024)
माजी मंत्री विलास मुत्तेमवार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत यांच्यात उमेदवारीवरून जोरदार भांडण सुरु आहे. यात भर घातली आहे ती माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि राजेंद्र मुळक यांनी. या दोन्ही नेत्यांनी सुद्धा रामटेकमधून आपल्या समर्थकासाठी तिकीट मागितले आहे. (Lok Sabha Elections 2024)
रामटेकच्या जागेवरून काँग्रेस नेत्यामध्ये किती तू तू मैं मैं होत आहे याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलाविलेल्या बैठकीत केवळ रामटेकच्या मुद्यावर तब्बल पाच तास चर्चा झाली. विलास मुत्तेमवार आपल्या समर्थकसाठी तिकीट मागत आहेत तर नितीन राऊत आपल्या मुलासाठी तिकीट मागत आहेत. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. (Lok Sabha Elections 2024)
चंद्रपूरमधून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आपल्या मुलीसाठी दिल्लीत ठाण मांडून  बसले आहेत. तर, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर सुद्धा लढण्यास उत्सुक आहेत. त्या सुद्धा दिल्लीत येऊन थांबल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वाडेट्टीवर आणि बाळासाहेब थोरात कालपासून दिल्लीत आहेत. (Lok Sabha Elections 2024)
पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण 102 जागांवर मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी पार पडणार आहे. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.