- ऋजुता लुकतुके
कर्नाटकातील राज्य सरकारच्या मालकीचा नंदिनी हा दूधाचा ब्रँड आणि गुजरातमधील अमूल यांच्यात गेल्यावर्षी झालेला संघर्ष तुम्हाला आठवतच असेल. आता हा संघर्ष पुन्हा एकदा उकळणार आहे. आणि यावेळी तो क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचण्याची लक्षणं आहेत. जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकात एक किंवा त्याहून जास्त संघांचं प्रायोजकत्व मिळवण्यासाठी अमूल बरोबरच आता नंदिनीनेही अर्ज केला आहे. (Nandini Vs Amul)
१ ते २९ जून दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. आणि यात २० संघ सहभागी होणार आहेत. यात खेळाडूंच्या जर्सीतील हातांवर (बाह्यांवर) आपला लोगो असावा यासाठी नंदिनी ब्रँडची मूळ कंपनी असलेल्या कर्नाटक दूध फेडरेशनने निविदा भरली आहे. एकप्रकारे नंदिनीने अमूलच्या पावलांवर पाऊल ठेवलं आहे. (Nandini Vs Amul)
(हेही वाचा – Lions Club of Mumbai Samruddhi: ‘लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धी’तर्फे सैनिकांना देण्यात येणार अनोखी भेट!)
अमूल ब्रँड करतो या संघाचे प्रायोजकत्व
कारण, २०११ मध्ये पहिल्यांदा अमूल ब्रँडची मूळ कंपनी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने नेदरलँड्स संघाला प्रायोजकत्व दिलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत अमूलचा लोगो न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांच्या जर्सीवर झळकला आहे. आताही अमूल ब्रँड अफगाणिस्तान संघाचं प्रायोजकत्व करतो. आता नंदिनी ब्रँडचीही वाटचाल त्या दृष्टीने सुरू आहे. (Nandini Vs Amul)
आगामी टी-२० विश्वचषकात १ किंवा २ संघांसाठी प्रायोजकत्वाचा करार करण्याची त्यांची तयारी आहे. यात भारतीय संघाचाही समावेश आहे. नंदिनी सध्या यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. पण, कर्नाटक मिल्क फेडरेशन ही सरकारी मालकीची कंपनी असल्यामुळे त्यांना सरकार बरोबरच निवडणूक आयोगाचीही परवानगी लागेल. आणि निविदा भरत असतानाच या परवानगीसाठीही त्यांनी अर्ज केला आहे. देशात केंद्रीय निवडणुका जाहीर झाल्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी बंधनकारक आहे. (Nandini Vs Amul)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community